आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Decision Of Maharashtra Cricket Association; 8 Men's And 4 Women's Teams Participated

आयपीएलच्या धर्तीवर महाराष्ट्रात एमपीएल:महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचा निर्णय; 8 पुरुष व 4 महिला संघ सहभागी

पुणे25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक स्तरावरील सर्वात लाेकप्रिय ठरलेल्या आयपीएलच्या धर्तीवर आता महाराष्ट्रामध्येही युवांसाठी खास क्रिकेट लीगचे आयाेजन केले आहे. यंदा एमपीएल नावाने हाेणाऱ्या या लीगमध्ये ८ पुरुष आणि ४ महिला क्रिकेट संघांचा समावेश असेल. पहिल्यांदाच आयाेजन केले जाणार असल्याचे सर्व सामने हे पुण्यातील एमसीएच्या मैदानावर खेळवले जातील, असा निर्णय अॅपेक्स समितीने घेतला, अशी माहिती महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष आ. राेहित पवार यांनी दिली. आयपीएलच्या धर्तीवर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून एमपीएल लीग सुरू करणार आहे. एमसीएअंतर्गत सध्या २४ संघ खेळत आहेत. या वर्षी या सर्वाचा अभ्यास असून ४८ संघ तयार करण्याचे उद्दिष्ट आहे, तर पुढील वर्षी ७२ संघ तयार करण्यात येणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने ज्याप्रमाणे १०० संघ तयार करुन स्पर्धेत उतरवले आहेत, त्याच धर्तीवर एमसीएसुद्धा १०० संघ तयार करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. खेळाडूंच्या लिलावापासून सर्व आयपीएलच्या धर्तीवरच घेण्यात येईल. पुण्यात हे सर्व सामने हाेतील.

वयचाेरीवर अंकुश, ३ वर्षे बंदी; क्लबही रडारवर! खेळाडूंची वयचोरी, पारदर्शक निवड, संघांची शिस्तबद्धतेचा विचार करून निवड हाेईल. प्रत्येक जिल्हा क्रिकेट असोसिएशनमध्येही अशाच प्रकारे पारदर्शक पणे खेळाडूंची निवड करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. वयचोरीमध्ये आढळल्यास खेळाडूवर तीन वर्षांची बंदी करण्याचा कडक नियम लागू करण्यात आला. तीन वेळा गोष्टी आढळून आल्यास क्लबवर काय कारवाई करायची याबाबत सध्या विचारविनिमय सुरू त्यंनी या वेळी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...