आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराक्रिकेटपटू दीपक चहरची पत्नी जया भारद्वाज यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. ही धमकी हैदराबाद क्रिकेट संघटनेचा माजी पदाधिकारी व त्याच्या मुलाने दिली आहे. या दोघांनी बिझनेसच्या नावाखाील जयाकडून 10 लाखांची रक्कम घेतली होती.
बिझनेस सुरू न झाल्याने जयाने पैसे परत मागितले असता आरोपींनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. एवढेच नाही तर त्यांच्याशी गैरवर्तनही केले. दीपकच्या वडिलांच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
भागीदारीचा झाला होता करार
क्रिकेटपटू दीपक चहरचे वडील लोकेंद्र चहर आग्र्याच्या शाहगंज ठाणे हद्दीतील मानसरोवर कॉलनीत राहतात. त्यांनी पोलिसांना सांगितले की, पारीख स्पोर्ट्स अँड शॉपचे मालक ध्रुव पारीख यांचे वडील कमलेश पारीख यांचा बुटांचा व्यवसाय आहे. माझी सून जया भारद्वाज हिने त्यात भागीदारीसाठी ऑनलाइन लीगल अॅग्रिमेंट साइन केले होते. नेट बँकिंगच्या माध्यमातून आरोपींना 7 ऑक्टोबर 2022 रोजी 10 लाख रुपये देण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी आमची फसवणूक केली.
पैसे परत मागितल्याने धमकी
लोकेंद्र चहर यांनी तक्रारीत म्हटले आहे की, आरोपी कमलेश पारीख हैदराबाद क्रिकेट असोसिएशनमध्ये राज्य क्रिकेटपटू संघांचा माजी व्यवस्थापक आहे. त्यांचा मुलगा ध्रुव पारीख याची आग्रा येथील एमजी रोडवर पारिख स्पोर्ट्स नावाची फर्म आहे. आम्ही पैसे परत मागितल्यानंतर आरोपींनी आपली वरपर्यंत पोहोच असल्याचे सांगून आम्हाला धमकावले. त्यांनी घाणेरडी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी हरिपर्वत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गतवर्षी जून महिन्यात झाले होते दीपक-जयाचे लग्न
दीपकची पत्नी जया दिल्लीची आहे. जया व क्रिकेटर दीपक चहरचे गतवर्षी जूनमध्ये लग्न झाले होते. चहर हा इंडियन प्रीमियर लीगच्या चेन्नई सुपर किंग्ज संघाचा सदस्य आहे. चेन्नईने त्याला 14 कोटींमध्ये पुन्हा संघात समाविष्ट केले आहे. दीपक दुखापतीमुळे बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियातून बाहेर आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.