आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मसिआ T-20:ग्रामीण पोलिसविरुद्ध बँकर्स संघाचा पराभव

क्रीडा प्रतिनिधी | छत्रपती संभाजीनगर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मसिआतर्फे आयोजित टी-२० क्रिकेट स्पर्धेत गरवारे स्टेडियमवर शुक्रवारी झालेल्या सामन्यात ग्रामीण पोलिस संघाने कम्बाइन बँकर्स संघावर ६ गडी राखून मात केली. या लढतीत ईशांत राय सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

प्रथम फलंदाजी करताना बँकर्सने २० षटकांत ९ बाद १२५ धावा उभारल्या. यात अाकाश बोराडेने १९ चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह ३० धावा केल्या. निखिल मुरूमकरने १८, इंद्रजित उढाणने १३, सूरज फासेने १७ धावा केल्या. हरमितसिंग रागीने ३३ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारासह ३३ धावांची खेळी केली. पोलिसांकडून ईशांत रायने ४, विजय जाधवने २ बळी घेतला.

प्रत्युत्तरात ग्रामीण पोलिसांनी १८ षटकांत ४ गडी गमावत विजयी साकारला. यात विकास नगरकरने शानदार अर्धशतक झळकावले. त्याने ५१ चेंडूंत ७ चौकारांसह ५५ धावांची खेळी केली. अविनाश मुळेने नाबाद २९ धावांचे योगदान दिले. ईशांत राय ७ धावांवर नाबाद राहिला. बँकर्सकडून हरमितसिंग रागी व निखिल मुरूमकरने प्रत्येकी २ बळी घेतले.

शहर पोलिस संघाचा विजय; सुदर्शन ठरला सामनावीर
दुसऱ्या सामन्यात शहर पोलिस संघाने मनपा अ संघावर ५६ धावांनी विजय मिळवला. प्रथम खेळताना शहर पोलिसांनी १८ षटकांत ६ बाद १८० धावा उभारल्या. यात प्रदीप जगदाळेने ५२ आणि अजय काळेने ५३ धावांची अर्धशतकी खेळी केली. प्रदीप व अजय जोडीने पहिल्या गड्यासाठी १०६ धावांची भागीदारी केली. राहुल जोनवाल ३६ धावांवर नाबाद राहिला. मनपाकडून हर्ष कीर्तिकरने ३ व अल्ताफ खानने २ बळी घेतले. प्रत्युत्तरात मनपा संघ निर्धारित षटकांत ८ बाद १२४ धावा करू शकला. राजेश कीर्तिकरने ४७ व हर्ष कीर्तिकरने ४५ धावा काढल्या. पोलिसांकडून सुदर्शन एखंडेने ४ व जलानी शेखने २ बळी घेतले.