आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेनिस:नंबर वन इगाचा पराभव; पेगुला विजयी

सिडनीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील नंबर वन महिला टेनिसपटू इगा स्वातेकला शुक्रवारी पहिल्या सत्राच्या युनायटेड कप टेनिस स्पर्धेत पराभवाचा सामना करावा लागला. अमेरिकेच्या जेसिका पेगुलाने उपांत्य सामन्यात स्वातेकला सरळ दाेन सेटमध्ये धूळ चारली. तिने ६-२, ६-२ अशा फरकाने सनसनाटी विजयाची नाेंद केली.

जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या पेगुलाने ७१ मिनिटांत एकतर्फी विजय साजरा केला. फ्रेंच ओपन आणि यूएस ओपन चॅम्पियन स्वातेकने गत 4 सामन्यांत पेगुलावर मात केली हाेती. मात्र, आता याच पराभवाची परतफेड करत पेगुलाने विजय साकारला.

बातम्या आणखी आहेत...