आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादक्षिण आफ्रिका संघाला टी-२० विश्वचषकामध्ये दुबळ्या हाॅलंड टीमविरुद्धची सुमार खेळी चांगलीच महागात पडली. या लाजिरवाण्या पराभवाने आफ्रिकेच्या उपांत्य फेरीतील प्रवेशाच्या आशा धुळीस मिळाल्या. त्यामुळे हाॅलंडविरुद्धचा हा लाजिरवाणा पराभव दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. यातून आता या बाेर्डाकडून आपल्या वर्ल्डकपमध्ये सहभागी संघाच्या कामगिरीचे पाेस्टमॉर्टेम केले जाणार आहे. यातून स्पर्धेत सुमार खेळी करणाऱ्या खेळाडूंना निश्चितपणे लवकरच नारळ दिले जाण्याची शक्यता आहे. यातून पुढच्या वर्षीच्या वनडे विश्वचषकादरम्यान दक्षिण आफ्रिका संघामध्ये माेठा बदल हाेण्याचे चित्र आहे. संघाच्या कामगिरीचा रिव्ह्यू करण्यासाठी एका पॅनलची नियुक्ती करण्यात आली. हे पॅनल आता संघाच्या स्पर्धेतील कामगिरीचे पूर्णपणे निरीक्षण करणार आहे. त्यानंतर पॅनल आपला अहवाल बाेर्डाकडे सादर करेल. त्यानंतर ठाेस असा निर्णय घेतला जाणार आहे. ‘पुढच्या वर्षी भारतात हाेणाऱ्या वनडे विश्वचषकापर्यंत मजबूत असा संघ तयार करण्यावर आमचा भर असेल. त्यामुळेच आम्ही या विश्वचषकातील आमच्या दुबळ्या बाजू दूर करण्यासाठी प्रयत्न करणार आहाेत. यासाठी पॅनलचा अहवाल उपयुक्त ठरेल, अशी प्रतिक्रिया बाेर्डाचे डायरेक्टर ऑफ क्रिकेट एन. इनाेच यांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.