आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागतसत्रातील चॅम्पियन आणि उपविजेता फुटबाॅल संघ यंदा चॅम्पियन्स लीगच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये समाेरासमाेेर असणार आहेत. यादरम्यान रिअल माद्रिद आणि लिव्हरपूल यांच्यात सामना रंगणार आहे. चॅम्पियन्स लीगच्या उपउपांत्यपूर्व फेरीचे ड्रॉ जाहीर करण्यात आले आहेत. यंदा २८ मे राेजी पॅरिसच्या मैदानावर रिअल माद्रिदने फायनलमध्ये लिव्हरपूलचा पराभव करून चॅम्पियन्स लीगचा किताब जिंकला हाेता. आता सहा सत्रात चाैथ्यांदा या दाेन्ही संघांमध्ये सामना हाेत आहे. आता या दाेन्ही संघांतील सामन्यावर सर्वांची नजर असेल. लिव्हरपूल फायनलमधील पराभवाची परतफेड करण्यासाठी उत्सुक आहे. कारण, सध्या लिव्हरपूल क्लबची कामगिरी लक्षवेधी ठरत आहे. प्रीमियर लीगच्या चॅम्पियन मँचेस्टर सिटीला आरबी लिपजिंग क्लबच्या आव्हानाचा सामना करावा लागेल.
असे हाेणार सामने आरबी लिपजिंग विरुध्द मँचेस्टर सिटी क्लब ब्रगेस विरुध्द बेनफिका लिव्हरपूल विरुध्द रिअल माद्रिद एसी मिलान विरुध्द टॉटेनहम फ्रँकफर्ट विरुध्द नेपाली बोरुसिया डॉर्टमंड विरुध्द चेल्सी इंटरमिलान विरुध्द पाेर्टो पीएसजी विरुध्द बायर्न म्युनिच
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.