आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Defending Champions Australia Need A Big Win Today! Afghanistan Hope For First Victory

वर्ल्डकप:गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला आज माेठ्या विजयाची गरज!  अफगाणिस्तानला पहिल्या विजयाची आशा

अॅडिलेडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया संघाला आपल्या घरच्या मैदानावरील टी-२० विश्वचषकात आगेकूच कायम ठेवण्यासाठी माेठ्या विजयाची गरज आहे. यासाठी यजमान ऑस्ट्रेलिया संघ मैदानावर उतरणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यात शुक्रवारी अॅडिलेडच्या मैदानावर सामना हाेणार आहे. हे दाेन्ही संघ या मैदानावर दुपारच्या सत्रातील सामन्यात समाेरासमाेर असतील. तसेच सकाळच्या सत्रामध्ये न्यूझीलंड आणि आयर्लंड यांच्यात सामना हाेणार आहे. या सामन्यात न्यूझीलंड टीमला विजयाची संधी आहे. या सामन्यातील विजयाने अ गटात अव्वलस्थानी असलेल्या न्यूझीलंड संघाला उपांत्य फेरीचा प्रवेश निश्चित करण्याची माेठी संधी आहे.

ऑस्ट्रेलिया संघाला गुणतालिकेतील आपला नेट रनरेट सुधारण्यासाठी आता माेठी कसरत करावी लागणार आहे. यासाठी ऑस्ट्रेलिया संघाचा शुक्रवारच्या सामन्यातील माेठा विजय महत्त्वाचा ठरणार आहे. सध्या ऑस्ट्रेलिया संघ अ गटामध्ये पाच गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. संघाचे चार सामन्यांत दाेन विजय नाेंद आहेत. तसेच अफगाणिस्तान संघाला पहिल्या विजयाची आशा आहे. संघाला गटामधील चारपैकी दाेन सामन्यांमध्ये पराभवाला सामाेेरे जावे लागले. तसेच संघाचे दाेन सामने पावसामुळे रद्द झाले आहेत. यातील प्रत्येकी एका गुणाने अफगाणिस्तान संघाच्या नावे दाेन गुणांची नांेंद आहे.

अ गट संघ मॅच विजय परा. NR गुणNRR न्यूझीलंड 4 2 1 1 52.233 इंग्लंड 4 2 1 1 50.547 ऑस्ट्रेलिया 4 2 1 1 5-0.304 श्रीलंका 4 2 2 0 4-0.457 आयर्लंड 4 1 2 1 3-1.544 अफगाणिस्तान 4 0 2 2 2-0.718 ब गट संघ मॅच विजय परा. NR गुणNRR भारत 4 3 1 0 60.730 द.आफ्रिका 4 2 1 1 51.441 पाकिस्तान 4 2 2 0 41.117 बांगलादेश 4 2 2 0 4-1.276 झिम्बाब्वे 4 1 2 1 3-0.313 हाॅलंड 4 1 3 0 2- 1.233

बातम्या आणखी आहेत...