आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्राझीलला बाद फेरीचा सर्वाधिक अनुभव:गतविजेता फ्रान्स बाद फेरीचे सामने जिंकण्यात पटाईत; 72% विजय

दोहा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोर्तुगालच्या विजयासह विश्वचषकातील सर्व ८ उपांत्यपूर्व फेरीचे संघ निश्चित झाले. उपांत्यपूर्व फेरीचे सामने ९ डिसेंबरपासून सुरू होणार आहेत. यंदा फ्रान्स सर्वात यशस्वी संघ आहे. त्यांनी ७२% सामने जिंकले.

९ पासून अंतिम-८ चे सामने होणार सुरू 9 डिसेंबर 2022 क्रोएशिया Vs ब्राझील 10 डिसेंबर 2022 नेदरलँड्स Vs अर्जेंटिना 10 डिसेंबर 2022 मोरोक्को Vs पोर्तुगाल 11 डिसेंबर 2022 इंग्लंड Vs फ्रान्स

1. फ्रान्सकडे सर्वाधिक सामने जिंकण्याचा अनुभव आहे. फ्रान्सने २१ सामने खेळले व ७२% (१५) जिंकले. त्यांना केवळ ६ गमावले. 2. क्रोएशियाने फक्त ७ बाद सामने खेळले, परंतु ७१% (५) जिंकले. १९९८ च्या उपांत्य फेरीत व २०१८ च्या अंतिम फेरीत क्रोएशिया हारला. 3. ब्राझीलने सर्वाधिक ४० बाद सामने खेळला. त्याने ७०% (२८) विजय मिळवले, तर ३०% (१२) सामन्यांमध्ये पराभव झाला. 4. अर्जेंटिनाने त्यांच्या बाद फेरीतील ६०% (१५) सामने जिंकले. २५ बाद सामने खेळले व ४०% (१०) लढती गमावल्या. 5. १९६६ मध्ये एकमेव विश्वचषक जिंकणाऱ्या इंग्लंडने एकूण २० सामने खेळले, त्यांचा पराभव व विजयाचा दर ५०-५० टक्के राहिला. 6. नेदरलँड्सने ३ फायनल खेळल्या व एकदाही जिंकला नाही. १८ बाद सामने खेळले व ४५% (८) जिंकले. १० सामने गमावले. 7. पोर्तुगाल संघाने केवळ ७ बाद सामने खेळले आहेत. ४३% (३) सामने जिंकले आणि त्यांनी ५७% (४) सामने गमावले. 8. मोरोक्कन संघ प्रथमच उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला. त्याने याआधी फक्त १ बाद फेरीचा सामना खेळला, त्याच पराभव झाला.

बातम्या आणखी आहेत...