आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Delhi Beat Gujarat Giants; Win By 10 Wickets For The Second Day In A Row

महिला आयपीएल:दिल्लीची गुजरात जायंट्स संघावर मात ; सलग दुसऱ्या दिवशी 10 गडी राखून विजय

मुंबई15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिला प्रीमियर लीगमध्ये सलग दुसऱ्या दिवशी एखाद्या संघाने १० गड्यांनी विजय मिळवला. यंदा दिल्ली कॅपिटल्सने हे यश मिळवले. यापूर्वी शुक्रवारी यूपी वॉरियर्जने विजय साकारला होता. दिल्लीची अष्टपैलू मरिजाने केप या सामन्याची हीरो ठरली. तिने ४ षटकांत १५ धावा देत ५ गडी बाद केले. चालू लीगमध्ये तिसऱ्यांदा एखाद्या गोलंदाजाने ५ बळी घेतले आहेत. यापूर्वी गुजरातच्या किम गार्थ व दिल्लीच्या तारा नॉरिस यांनी अशी कामगिरी केली. द. आफ्रिकन मरिजाने सामनावीर ठरली. मरिजानेच्या घातक गोलंदाजींच्या समोर गुजरात ९ बाद १०५ धावा करू शकला. किम गार्थने सर्वाधिक नाबाद ३२ धावा केल्या. शिखा पांडेने तीन गडी टिपले. दिल्लीने ७.१ षटकांत बिनबाद १०७ धावा करत विजय साकारला. शेफाली वर्माने २८ चेंडूंत १० चौकार व ५ उत्तुंग षटकार खेचत नाबाद ७६ धावांची विजयी खेळी केली. हा दिल्लीचा ४ सामन्यांतील तिसरा विजय ठरला, तर गुजरातचा ४ सामन्यांतील तिसरा पराभव झाला.

बातम्या आणखी आहेत...