आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागुजरात जिंकण्याची जबाबदारी मूनी-गार्डनरवर महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या सत्राला ४ मार्चपासून सुरुवात होत आहे. त्याचे सर्व २२ सामने मुंबईच्या दोन स्टेडियममध्ये खेळवले जातील. ब्रेबॉर्न स्टेडियमवर २६ मार्च रोजी विजेतेपदाचा सामना रंगेल. जगातील या सर्वात मोठ्या महिला टी-२० क्रिकेट लीगमध्ये अनेक स्टार खेळताना दिसतील. त्यात भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर, टी-२० विश्वचषकात भारताची सर्वाधिक धावा करणारी स्मृती मानधना, सर्वाधिक बळी घेणारी रेणुका सिंग, ऑस्ट्रेलियाला विश्वविजेता बनवणारी कर्णधार मॅग लॅनिंगसह जागतिक दर्जाच्या खेळाडूंचा समावेश आहे. जाणून घेऊयात दोन चांगल्या खेळाडूंबद्दल..
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : महागडी खेळाडू ते सर्वोत्कृष्ट अष्टपैलू संघात
१. स्मृती मानधना : संघाची कर्णधार आणि लीगमधील सर्वात महागडा खेळाडू. तिने अलीकडेच टी-२० विश्वचषकात ४ डावांत १२३.८७ च्या स्ट्राइक रेटने १५१ धावा केल्या. संघाला चांगली सुरुवात करून देण्याची जबाबदारी तिच्यावर असेल. टी-२० चॅलेंजमध्ये ट्रेलब्लेझर्स संघाची ती कर्णधार होती.
२. एलिस पेरी : कठीण प्रसंगी मोठे डाव खेळण्यात माहिर असलेली पॅरी आपल्या अष्टपैलू खेळामुळे महत्त्वाची ठरू शकते. टी-२० विश्वचषक विजेती पेरी फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात अव्वल दर्जाची आहे. वेगवान गोलंदाज पॅरी कोणत्याही टप्प्यावर आपल्या गोलंदाजीने प्रतिस्पर्ध्याला अडचणीत आणू शकते.
दिल्ली कॅपिटल्स : युवांवर मदार, फलंदाजांकडून सर्वाधिक अपेक्षा
१. जेमिमा रॉड्रिग्ज : गेल्या वर्षी वनडे विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर तिने तिच्या खेळात अधिक आत्मविश्वास आणला आहे. ती आशिया चषकात २१७ धावांसह सर्वाधिक धावा करणारी खेळाडू होती, श्रीलंका दौरा, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ती भारताची दुसरी सर्वाधिक धावा करणारी खेळाडू होती.
२. शेफाली वर्मा : हरमनप्रीतपेक्षा २० लाखांनी महाग विकल्या गेलेल्या शेफालीने दाखवून दिले की तिला टी-२० मध्ये खूप मागणी आहे. २०२२ मध्ये टी-२० आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारी शेफाली त्या वर्षी सर्वाधिक सामने खेळणारी, सर्वाधिक धावा करणारी, सर्वाधिक चौकार, षटकार मारणारी खेळाडू होती. १९ वर्षाखालील चॅम्पियन संघाची खेळाडू आहे.
मुंबई इंडियन्स : अनुभवाला प्राधान्य, मोठ्या सामन्यांची जबाबदारी
१. नॅट स्कीव्हर ब्रंट : इंग्लंडच्या अष्टपैलू खेळाडूसाठी हे वर्ष खूप चांगले गेले. तिने टी-२० विश्वचषकाच्या ५ डावांत १४१.१७ च्या स्ट्राइक रेटने २१६ धावा केल्या आणि ती स्पर्धेतील दुसरी सर्वोच्च धावा करणारी खेळाडू बनली. ती वेस्ट इंडीज दौऱ्यावर वनडेत मालिकावीर ठरली.
२. हरमनप्रीत कौर : संघाची कर्णधार असलेल्या हरमनने या वर्षी ८ डावांत ३७.८३ च्या सरासरीने दोन अर्धशतके झळकावली. तिच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचला आणि तिने सर्वात मोठी खेळी खेळली. हरमन-नेट स्कीव्हर आणि अमेलिया कैरची कामगिरी फलंदाजीतील एक विजयी संयोजक बनू शकते.
गुजरात जायंट्स : भारतात यशस्वी मूनी कर्णधार, फलंदाजी मजबूत
१. अॅश्ले गार्डनर : ३.२ कोटींसह लीगमधील सर्वात महागडी परदेशी खेळाडू गार्डनर मधल्या फळीला मजबूत करेल. ती ऑफ-स्पिन गोलंदाजीत पारंगत आहे. या दोन गुणांमुळे ती कधीही सामन्याची दिशा बदलू शकते. ती टी-२० विश्वचषकात १२ धावांत ५ बळी सर्वोत्कृष्ट कामगिरी केली होती.
२. बेथ मूनी : ऑस्ट्रेलियाची मूनी ११ टी-२० मध्ये १३९.१८ च्या स्ट्राइक रेट आणि ४८.७१ च्या सरासरीने ३४१ धावांसह भारतीय परिस्थितीत परदेशात सर्वात यशस्वी ठरली. ती संघाची कर्णधार आहे. टी-२० विश्वचषकाच्या फायनलमध्ये तिने आफ्रिकेविरुद्ध ७४ धावांची विजयी खेळी केली. फिरकी-वेगवान दोघांच्या विरोधात चांगली फलंदाजी करते.
यूपी वॉरियर्स : यशस्वी गोलंदाज ते एकटी सामना जिंकवण्याची क्षमता
१. दीप्ती शर्मा : भारताच्या सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंपैकी एक दीप्ती २.६ कोटींसह दुसऱ्या क्रमांकाची महागडी खेळाडू आहे. टी-२० मध्ये १०० बळी घेणाऱ्या दीप्तीने या वर्षी ९ डावांत १५ बळी घेतले आहेत. गतवर्षी २९ बळी घेऊन ती सर्वाधिक बळी घेणारी गोलंदाज बनली होती.
२. एलिसा हिली : महिला क्रिकेटमधील सर्वात धोकादायक सलामीवीर फलंदाजांपैकी एक असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या हिलीला लीगमध्ये कर्णधारपदाची जबाबदारी मिळाली आहे. टी-२० विश्वचषकाच्या ५ डावांत ४७.२५ च्या सरासरीने आणि ११५.९५ च्या स्ट्राइक रेटने १८९ धावा केल्या. तिच्यात एकहाती सामने जिंकण्याची तिच्यात क्षमता आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.