आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Dewald Brewis Became South Africa's Youngest Batsman To Score A Century In T20Is

क्रिकेट:डेवाल्ड ब्रेविस टी-20 मध्ये ठरला दक्षिण आफ्रिकेचा सर्वात युवा शतकवीर फलंदाज

केपटाऊनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

फाॅर्मात असलेला युवा फलंदाज डेवाल्ड ब्रेविस सध्या आपल्या घरच्या मैदानावर देशांतर्गत स्पर्धेत झंझावाती खेळी करत आहे. यातूनच दक्षिण आफ्रिकेच्या या १९ वर्षीय फलंदाजाने एका टी-२० स्पर्धेत नाइट्स संघाविरुद्ध तुफानी खेळी केली. टायटन्स संघाचे प्रतिनिधित्व करत असलेल्या डेवाल्ड ब्रेविसने ३५ चेंडूंत शतक साजरे केले. त्याची नाइट्स संघाविरुद्ध ५६ चेंडूंत १६२ धावांची खेळी लक्षवेधी ठरली. यासह ताे आता आफ्रिकेचा सर्वात युवा शतकवीर फलंदाज ठरला. तसेच टी-२० मध्ये पाचव्या वेगवान शतकाची नाेंद झाली आहे. व्हिडिआे पाहून उंचावला दर्जा : बेबी एबी नावाने प्रसिद्ध असलेल्या डेवाल्ड ब्रेविसची क्रिकेटमधील कामगिरी काैतुकास्पद आणि प्रेरणादायी ठरलेली आहे. त्याने डिव्हिलियर्सच्या तुफानी खेळीचे व्हिडिआे पाहिले. यातून त्याने ही झंझावाती फलंदाजीची शैली आत्मसात केली. त्यामुळेच त्याला सध्या क्रिकेटच्या मैदानावर आपली वेगळी छाप पाडता आली आहे.

आक्रमक खेळीवर भर : मी सुरुवातच आक्रमक करण्यावर अधिक भर देताे. यासाठीच मी खेळीची शैली विकसित केली आहे. याचा मला निश्चितपणे वेळाेवेळी माेठा फायदा झाला आहे. यातूनच माझी आक्रमक खेळीची शैली आता अधिकच चर्चेत आली आहे, असेही त्याने सांगितले.

बातम्या आणखी आहेत...