आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Dhoni And Raina Start Practice On Second Day Of Retirement, Video Shared By Chennai Super Kings

आयपीएलसाठी माहीने उचलली बॅट:धोनी आणि रैनाने निवृत्तीच्या दुसऱ्या दिवशी सुरू केली प्रॅक्टीस, चेन्नई सुपर किंग्सने शेअर केला व्हिडिओ

चेन्नईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 15 ऑगस्ट रोजी महेंद्र सिंह धोनी आणि सुरेश रैनाने निवृत्तीची घोषणा केली आहे

महेंद्र सिंह धोनी आणि सुरेश रैनाने 15 ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. घोषणेच्या दुसऱ्याच दिवशी दोघांनी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)च्या तयारीसाठी परत एकदा बॅट हातात घेतली आहे. कर्णधार धोनी आणि उपकर्णधार रैनाने 16 ऑगस्टपासून सुरू झालेल्या चेन्नई सुपर किंग्स (सीएसके)च्या ट्रेनिंग कँपमध्ये प्रॅक्टीस सुरू केली आहे. सीएसकेने कँपनंतर ड्रेसिंग रुमचा एक व्डिडिओ शेअर केला आहे.

व्हिडिओत धोनी ट्रेनिंगनंतर ड्रेसिंग रुममध्ये येताना दिसत आहे आणि आल्यानंतर रैना आणि पीयूष चावलासह इतर खेळाडूंना भेटताना दिसत आहे. सीएसकेने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहीले, 'दोन मार्ग एका पिवळ्या पटरीवर परत येताना.'

धोनी अँड टीम 21 ऑगस्टला यूएईला रवाना होईल
ट्रेनिंग कँपनंतर सीएसके टीम 21 ऑगस्टला आयपीएलसाठी यूएईला रवाना होईल. यावर्षी आयपीएल यूएईमध्ये खेळवला जात आहे. 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबरपर्यंत आयपीएल असेल. बीसीसीआयने सर्व संघांना 20 ऑगस्टनंतर यूएईला जाण्याची परवानगी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...