आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Diego Maradena's Death Marks Three Days Of National Mourning In Argentina

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

श्रद्धांजली:दिएगाे मॅराडाेनाच्या निधनाने अर्जेंटिनामध्ये तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर

ब्यूनस आयर्स2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नेपाेली क्लब देणार आपल्या स्टेडियमला मॅराडाेनाचे नाव

जगातील प्रसिद्ध सुपरस्टार फुटबाॅलपटू िदएगाे मॅराडाेना यांचे बुधवारी निधन झाले. त्यामुळे फुटबाॅलच्या विश्वातील काेट्यवधी चाहत्यांनी श्रद्धांजली वाहिली. यादरम्यान मॅराडाेना यांच्या निधनानंतर आता अर्जेंटिनामध्ये तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला. याची अर्जेंटिना सरकारच्या वतीने गुरुवारी घाेषणा करण्यात आली आहे. दुसरीकडे आता इटलीच्या फुटबाॅल क्लब नेपाेलीने आपल्या येथील साआे पाउलाे स्टेडियमला दिवंगत मॅराडाेना यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लवकरच या स्टेडियमचे नव्याने नामकरण हाेणार आहे. कारण मॅराडाेना यांचे नेपाेली क्लबला सिरी एचे विजेतेपद मिळवून देण्यात माेलाचे याेगदान राहिले आहे. मॅराडाेना यांच्या सहभागी संघाने १९८७ आणि १९९० मध्ये सिरी एची ट्राॅफी पटकावली हाेती. त्यामुळे नेपाेली क्लबने हा माेठा निर्णय जाहीर केला आहे. याशिवाय क्लबमधील खेळाडूंनी मॅरेडाेना यांच्या निधनानंतर दुख व्यक्त केले.

आयएसएलमध्ये सामन्यापूर्वी खेळाडूंनी वाहिली श्रद्धांजली : गाेव्यात सुरू असलेल्या फुटबाॅलच्या सातव्या सत्राच्या इंडियन सुपर लीगमधील (आयएसएल) सामन्यापूर्वी गुरुवारी जगप्रसिद्ध फुटबाॅलपटू दिएगाे मॅराडाेना यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यासाठी सामन्यापूर्वी सर्व खेळाडूंनी एकत्र येऊन एक मिनिट माैन राखून श्रद्धांजली वाहिली. याशिवाय मॅराडाेना यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. तसेच खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानावर सामन्यासाठी उतरले हाेते. बुधवारी या जगप्रसिद्ध फुटबाॅलपटूचे निधन झाले. त्यामुळे जगभरासह भारतामधील फुटबाॅलपटूंना हा माेठा धक्का बसला आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser