आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय जिम्नॅस्ट दीपा कर्माकर प्रतिबंधित पदार्थांचे सेवन केल्याप्रकरणी अडचणीत सापडील आहे. आयटीए अर्थात इंटरनॅशनल टेस्टिंग एजंसीने दीपावर हायजेनामाइनचे सेवन केल्याप्रकरणी 21 महिन्यांची बंदी घातली आहे.
2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये प्रोडुनोव्हा प्रकारात दीपा कर्माकरचे पदक थोडक्यात हुकले होते. तिला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. पण या प्रकारातील तिची कामगिरी कमालीची थक्क करणारी होती. ती अनेकांसाठी आदर्श खेळाडू ठरली होती. आता 7 वर्षांनंतर दीपावर प्रतिबंधित पदार्थ सेवन केल्याचे आरोप झालेत.
ऑक्टोबर 2021मध्ये झाली होती टेस्ट
इंटरनॅशनल टेस्टिंग एजंसीने 11 ऑक्टोबर 2021 रोजी दीपाचे सॅम्पल तपासणीसाठी घेतले होते. त्यात तिने प्रतिबंधित हायजेनामाइनचे सेवन केल्याचे निष्पन्न झाले. तिचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आयटीएने तिच्यावर 21 महिन्यांची अपात्रतेची कारवाई केली. तिच्यावरील बंदी 10 जुलै 2023 पर्यंत कायम राहील. आयटीएने शुक्रवारी या कारवाईची पुष्टी केली.
प्रतिबंधित औषधी घेतल्याचा ठपका
दीपा कर्माकर हिजेमिन एस-3 बीटा-2 घेतल्याप्रकरणी दोषी आढळली. आंतरराष्ट्रीय डोपिंग एजंसीने Hygemin S-3 Beta-2 ला प्रतिबंधित औषधींच्या श्रेणीत ठेवले आहे.
राष्ट्रकुल स्पर्धेच्या इतिहासात पदक जिंकणारी दीपा कर्माकर पहिली भारतीय जिम्नॅस्ट आहे. 2014 च्या ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत तिने कांस्य पदक जिंकले होते. त्यानंतर ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारीही ती पहिली भारतीय जिम्नॅस्ट ठरली होती. त्यामुळे तिच्यावरील कारवाई भारतासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.