आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Direct Access To Sports Academy, Last Two Days For Submission Of Application

औरंगाबाद:क्रीडा प्रबोधिनीत मिळणार थेट प्रवेश, अर्ज जमा करण्यासाठी अखेरचे दोन दिवस

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील विविध ९ क्रीडा प्रबोधिनींमध्ये खेळाडूंची थेट निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी खेळानिहाय कौशल्य चाचण्यांद्वारे आयोजन करण्यात येणार असून खेळाडूंनी १० ते १३ मे २०२२ दरम्यान आपापल्या जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावा लागेल. अर्ज जमा करण्यास अखेरचे दोन दिवस शिल्लक आहेत. निवड झालेल्या खेळाडूंना शास्त्रोक्त प्रशिक्षण, शिक्षण, भोजन, निवास अद्ययावत क्रीडा सुविधा, क्रीडा प्रबोधिनीच्या अंतर्गत देण्यात येतील. अर्ज करणाऱ्या खेळाडूंचे वय १९ वर्षांआतील असावे. अनिवासीमध्ये अधिकृत राज्य, राष्ट्रीय, स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय स्थान प्राप्त करणाऱ्या खेळाडूंना प्राधान्याने प्रवेश देण्यात येईल. इतर खेळाडूंची त्यांच्या क्रीडा प्रकारानुसार विविध कौशल्यांची चाचणी घेऊन त्याआधारे खेळाडूंना प्रवेश देण्यात येईल. अर्जासोबत क्रीडा प्रमाणपत्रे, आधार कार्ड, जन्मदाखला इत्यादी कागदपत्रे जमा करावे लागतील.

खेळनिहाय क्रीडा प्रबोधिनी
अमरावती - आर्चरी, ज्युदो. नागपूर - हँडबॉल, ॲथलेटिक्स. अकोला - बॉक्सिंग. गडचिरोली - ॲथलेटिक्स. ठाणे - बॅडमिंटन. नाशिक - शूटिंग, ॲथलेटिक्स. कोल्हापूर - शूटिंग, कुस्ती. औरंगाबाद - ॲथलेटिक्स, हॉकी. पुणे - टेबल टेनिस, वेटलिफ्टिंग, जिम्नॅस्टिक.

बातम्या आणखी आहेत...