आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॅडमिंटन:जिल्हा बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा 5 नोव्हेंबरपासून

औरंगाबाद25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद जिल्हा शटल बॅडमिंटन संघटनेतर्फे औरंगाबाद जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेचे ५ ते ७ नोव्हेंबरदरम्यान वसंतराव नाईक महाविद्यालयातील बॅडमिंटन हॉलमध्ये आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत ११, १३, १५, १७ मुले व मुली एकेरी व दुहेरी या वयोगटात सहभागी होतील.

स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी सायंकाळी ५ वाजता भविष्य निर्वाह कार्यालयाचे विभागीय आयुक्त जगदीश तांबे यांच्या हस्ते होईल. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून वसंतराव नाईक शिक्षण संस्थेचे सचिव नितीन राठोड व जिल्हा बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष शिरीष बोराळकर यांची उपस्थिती राहिल. पंच म्हणून मिलिंद देशमुख व अतुल कुलकर्णी जबाबदारी पार पाडतील. जास्तीत जास्तीत जास्त खेळाडू, नागरिक, पालकांनी स्पर्धेचा आनंद घ्यावा, असे आवाहन संघटनेचे सचिव सिद्धार्थ पाटील, वीरेन पाटील यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...