आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबुलंद संभाजीराजे सामाजिक व सांस्कृतिक क्रीडा मंडळ, नेहरू युवा केंद्र व ग्रीन आर्मी महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त व जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेत विविध गटांत विराज घोगरे, जिया पटेल, पार्थ कुलकर्णी, खुश पखाले, श्रवण घोगरे यांनी उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक आपल्या नावे केले.
विभागीय क्रीडा संकुल येथे झालेल्या स्पर्धेत एकूण १२० खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. स्पर्धेचे उद्घाटन अनुरूपा पंडित यांच्या हस्ते झाले. विजेत्या खेळाडूंना जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई यांच्या हस्ते छत्रपतींचे स्मृतिचिन्ह, पदक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष भिकन अंबे, संघटनेच्या सचिव राधिका अंबे, गणेश बनसोडे, विकास घोगरे आदींची उपस्थिती होती.
स्पर्धेतील विजेते खेळाडू पुढीलप्रमाणे : ४ वर्षे गट - विराट जाधव, सुबतीश बनसोडे. मुली - अनायरा खरोटे. ६ वर्षे गट - विराज घोगरे, हर्ष यादव, विश्वजित जाधव. मुली - जिया पटेल. ८ वर्षे गट - पार्थ कुलकर्णी, प्रणीत धोबटे, हसनैन मोहंमद, नैतिक बुजाडे. मुली - नयनतारा पंडित, सिया दराडे. १० वर्षे गट - खुश पखाले, आरव जिने, ध्रुव खंडागळे. मुली - स्वरा पत्की, नंदिनी पटेल. १२ वर्षे गट - श्रवण घोगरे, यश घुसिंगे, अर्णव भगत. मुली - सर्वदा तळीखेडकर. १४ वर्षे गट - अजिंक्य कुशवाह, ओम धनकर.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.