आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Diwali Bonus To Scotland; Qualifiers For Euro Cup After 24 Years, Beat Serbia

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फुटबॉल:स्कॉटलंडला दिवाळी बाेनस; 24 वर्षांनी युरो कपसाठी पात्र, पात्रता फेरीत सर्बियाला पेनल्टी शूटआऊटवर 5-4 ने हरवले

बेलग्रेड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुढील वर्षी युरो कप; 24 संघ झाले निश्चित

स्कॉटलंडच्या फुटबॉल टीमने युरो कपसाठी पात्रता मिळवली आहे. स्कॉटलंडने क गटातील पात्रता फेरीत सर्बियाचा पेनल्टी शूटआऊटवर ५-४ ने पराभव केला. बेलग्रेडच्या रेड स्टार स्टेडियमवर झालेल्या सामन्यात निर्धारित वेळेत दोन्ही टीमने १-१ ने बरोबरी राखली. स्कॉटलंडकडून रेयान क्रिस्टीने ५२ व्या आणि सर्बियाच्या लुका जोविचने ९० व्या मिनिटाला गोल केला होता. क्रिस्टीने गत ५ सामन्यांत ४ गोले केले असून यापूर्वीच्या ९ सामन्यांत तो एकही गोल करू शकला नव्हता. स्कॉटलंडची टीम २४ वर्षांनंतर युरो कपमध्ये खेळेल. ही त्यांची १९९८ नंतर पहिली मोठी स्पर्धा असेल. तेव्हा टीम विश्वचषक खेळली होती. स्कॉटलंड टीम ९ सामन्यांत अजेय आहे. त्यांनी ६ लढती जिंकल्या आणि ३ बरोबरीत राखल्या. ही त्यांची ९० वर्षांतील उत्कृष्ट कामगिरी ठरली. १९३० मध्ये स्कॉटलंडने सलग ११ सामने जिंकले होते. सर्बियाची टीम सलग चौथ्यांदा युरो कपसाठी पात्रता मिळवू शकली नाही.

२४ संघांची ६ गटांत झाली विभागणी
अ गट - इटली, स्वित्झर्लंड, तुर्की, वेल्स.
ब गट - बेल्जियम, रशिया, डेन्मार्क, फिनलंड.
क गट - युक्रेन, हॉलंड, ऑस्ट्रिया, मेसाडोनिया.
ड गट - इंग्लंड, क्रोएशिया, गणराज्य, स्कॉटलंड. {ई गट - स्पेन, पोलंड, स्वीडन, स्लोव्हाकिया.
फ गट - जर्मनी, फ्रान्स, पोर्तुगाल, हंगेरी.
११ जून ते ११ जुलैदरम्यान होईल स्पर्धा

बातम्या आणखी आहेत...