आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Djokovic In The Semifinals; Carlos Wins Over Nadal, Sitsipas Wins Over Sensational Rublev | Marathi News

माद्रिद ओपन टेनिस स्पर्धा:योकोविक उपांत्य फेरीत; कार्लोसचा नदालवर विजय, सितसिपासचा सनसनाटी रुबलेववर विजय

माद्रिद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील नंबर वन टेनिसपटू नोवाक योकोविक आणि स्पेनच्या १८ वर्षीय कार्लोस गार्फियाने शनिवारी माद्रिद ओपन टेनिस स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. दरम्यान पाच वेळच्या किताब विजेत्या राफेल नदालला उपांत्यपूर्व फेरीत लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे त्याचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

सर्बियाच्या नोवाक योकोविकने पुरुष एकेरीच्या क्वार्टर फायनलमध्ये पोलंडच्या ह्यबर्ट हरकेचवर सरळ दोन सेटमध्ये विजय संपादन केला. त्याने ६-३, ६-४ ने सहज सामना जिंकला. यासह त्याला अंतिम चारमधील प्रवेश निश्चित करता आला. दुसरीकडे मियामी ओपन चॅम्पियन कार्लोसने आपल्याच देशाच्या राफेल नदालवर सनसनाटी विजयाची नोंद केली. त्याने ६-२, १-६, ६-३ अशा फरकाने विजय संपादन केला. यासह त्याला उपांत्य फेरीचा पल्ला यशस्वीपणे गाठता आला.

दुसरीकडे ग्रीसच्या सितसिपासने एकेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यामध्ये आंद्रे रुबलेवचा पराभव केला. त्याने ६-३, २-६, ६-४ ने विजय संपादन केला. यासह त्याला उपांत्य फेरी गाठता आली. आता त्याचा सामना दुसऱ्या मानांकित ज्वेरेवशी होईल. जर्मनीच्या ज्वेरेवने सामन्यात कॅनडाच्या फेलिक्सचा ६-३, ७-५ ने पराभव केला.

बातम्या आणखी आहेत...