आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजर्मनीचा अलेक्झांडर ज्वेरेववर पाच सेटने विजय मिळवत नोवाक योकोविक टेनिसमधील सर्वात मोठे यश मिळवण्याच्या एक पाऊल दूर आहे. अव्वल मानांकित योकोविकने चौथ्या मानांकित ज्वेरेवला ४-६, ६-२, ६-४, ४-६, ६-२ ने हरवले. ३४ वर्षीय सर्बियन खेळाडूला १९६९ नंतर कॅलेंडर ग्रँडस्लॅम पूर्ण करण्याची संधी आहे. तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या रॉड लेवरने अशी कामगिरी केली होती. कॅलेंडर ग्रँडस्लॅम म्हणजे एका वर्षातील ४ ग्रँडस्लॅम जिंकणे. त्याचा जेतेपदाचा सामना दुसऱ्या मानांकित डॅनियल मेदवेदेवशी होईल. २५ वर्षीय रशियन खेळाडू मेदवेदेवने उपांत्य सामन्यात कॅनडाच्या १२ व्या मानांकित फेलिक्स ऑगर एलियासिमेला ६-४, ७-५, ६-२ ने हरवले. योकोविक व मेदवेदेव यांच्यात ८ सामने झाले, यात योकोविकने ५ जिंकले.
शनिवारी रात्री युवा स्टार एमा राडुकानू (इंग्लंड) व लेहाल एनी फर्नांडेज (कॅनडा) महिला एकेरीच्या अंतिम फेरीत भिडतील. राडुकानूची जागतिक क्रमवारी १५० असून ती या ग्रँडस्लॅमच्या अंतिम सामन्यात पोहोचणारी पहिली पात्रताधारक खेळाडू आहे.
सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकण्याचा विक्रम करू शकतो योकोविक
रविवारी रात्री योकोविक व मेदवेदेवमध्ये अंतिम सामना रंगेल. योकोविक प्रतिस्पर्धी रॉजर फेडरर व राफेल नदाल सोबत सर्वाधिक २० ग्रँडस्लॅम जिंकणारा खेळाडू आहे. आता ताे या दोघांतून बाहेर पडू शकतो. २४ वर्षीय ज्वेरेवला पराभूत केल्यानंतर योकोविकने म्हटले की,‘काम अद्याप पूर्ण झाले नाही. उत्साह, प्रेरणा, जोश आहे. मी आपल्या पुढील सामन्यात माझा करिअरचा शेवटचा सामना आहे, असा खेळेल.’ ज्वेरेवने यंदा टोकियो ऑलिम्पिकमध्ये योकोविकला ३ सेटमध्ये हरवले होते. योकोविकचा ज्वेरेव विरुद्ध जय-पराजयाचा आलेख ६-३ झाला.
अव्वल योकोविक दुसऱ्या मानांकित मेदवेदेवशी भिडणार
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.