आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Doctor Told She Couldn't Walk After Birth, 10 Year Old Haley Breaks 6 Distance Records

नॅशनल रेकाॅर्ड हाेल्डर युवा धावपटू:डाॅक्टरने जन्मानंतर सांगितले चालू शकणार नाही, 10 वर्षीय हॅलीने पळत गाठला 6 विक्रमांचा पल्ला

क्विन्सलँडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आॅस्ट्रेलियाची युवा धावपटू हॅली मॅककाेम्बेसने वयाच्या दहा वर्षी जगभरातील चाहत्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. तिने आपल्या अल्पावधीतील करिअरमध्ये प्रचंड मेहनत आणि इच्छाशक्तीच्या बळावर अनेक पदकांचा बहुमान पटकावला. तसेच तिने यादरम्यान सहा राष्ट्रीय विक्रमांनाही गवसणी घातली. त्यामुळे आता या नॅशनल रेकाॅर्ड हाेल्डर युवा धावपटूची नजर २०२८ मधील पॅरालिम्पिक स्पर्धेच्या तिकिटाकडे लागली आहे. आपली क्षमता आणि गुणवत्ता तिला या जागतिक दर्जाच्या ट्रॅकवर सिद्ध करायची आहे. यासाठीच ती सध्या प्रयत्नशील आहे. दहा वर्षी धावपटू हॅलीच्या नावे १००, २००, ३००, ४००, ८०० आणि १५०० मीटरच्या शर्यतीमध्ये सहा राष्ट्रीय विक्रमाची नाेंद आहे. त्यामुळे वाऱ्याच्या वेगाने धावणारी हॅली निश्चितपणे २०२८ मध्ये आॅलिम्पिकचा पल्लाही यशस्वीपणे गाठू शकेेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. मात्र, यादरम्यान तिला २०२८ मध्ये ट्राॅयथलाॅनमध्ये सहभाग नाेंदवावा लागणार आहे. कारण २०२८ पॅरालिम्पिकमध्ये अॅथलेटिक कॅटेगरी नाही. हॅलीच्या जन्मानंतर कुटुंबीयांमध्ये भिती आणि निराशेचे वातावरण निर्माण झाले हाेते. कारण जन्मानंतर ती अजिबात चालू शकणार नाही, असे वैद्यकीय तज्ञांनी सांगितले हाेते. त्यामुळे हॅलीच्या नशिबात आता अधुपण आले, अशीच घरच्यांची भावना हाेती. कारण, तिच्या दाेन्ही पायांना गुडघ्यांच्या खाली संवेदना हाेत नाहीत. तिला स्पाइना चा आजार जडला. गर्भात असलेल्या भ्रूणाच्या पायाची पूर्णपणे वाढ आणि विकास हाेत नाही.

समज आल्यापासून धावण्यास सुरुवात : हॅलीला समज आली की आपण कुठल्याही प्रकारे चालू शकणार नाही. तेव्हापासून तिने धडपडत धावण्यास सुरुवात केली. अनेक वेळा तिला खाली पडावे लागले. मात्र, तिने जिद्द साेडली नाही. यातूनच तिने आपली क्षमता डेव्हलप केली. त्यामुळे तिला धावता येऊ लागले.

बातम्या आणखी आहेत...