आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:अॅथलेटिक्स स्पर्धेत कृष्णा, प्रतीक्षा, स्वातीला दुहेरी मुकुट

औरंगाबाद14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मैदानावर आयोजित जिल्हा संघ निवड चाचणी स्पर्धेत कृष्णा ठोंबरे व प्रतीक्षा वासके सर्वात वेगवान धावपटू ठरले. कृष्णा, प्रतीक्षासह स्वाती वाटणेने दुहेरी यश मिळवले. पहिल्या दोन खेळाडूंची उस्मानाबाद, मुंबई व अमरावती येथे होणाऱ्या राज्य स्पर्धेसाठी संघात निवड झाली आहे. स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार श्रीकांत जोशी यांच्या हस्ते झाले.

१०० मी. धावणे - कृष्णा ठोंबरे, सम्यक गायकवाड. २०० मी. - कृष्णा ठोंबरे, सम्यक. ४०० मी. - शुभम दवंडे, प्रताप शिरसाठ. ८०० मी. - भगवान जाधव, सचिन तायडे. १५०० मी. - राजू धनवाई, गणेश मोकाटे. ३००० मी. - संतोष भवले, अंकुश सपकाळ. ५००० मी. - सुनील दांगोडे, रवी कापसे. ११० मी. हर्डल्स - कृष्णा दहीवाडकर. लांब उडी - रोहन मोहाते, अर्जुन अपशिंदे. गोळाफेक - ज्ञानेश्वर राठोड, सुनील शिंदे. थाळीफेक - सौरभ धनवडे, नरेंद्र चौधरी. भालाफेक - आदित्य नरवडे, संदेश फोलाणे. मुली १०० मी.- प्रतीक्षा, गायत्री भोसले. २०० मी. स्वाती, गीतांजली कळसकर. ४०० मीटर - श्रावणी नानवरे. ८०० मीटर - साक्षी मोरे, रिद्धी. १५०० मीटर - मयूरी सोनेट, दिव्या सोनवणे. ३००० मीटर - शुभांगी राजेंद्र.

बातम्या आणखी आहेत...