आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Double Crown For Raghav Dhumak, Gold For Sanskriti In District Championship

बॅडमिंटन:जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेत राघव धुमकला दुहेरी मुकुट, संस्कृतीला सुवर्ण

औरंगाबाद5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा शटल बॅडमिंटन संघटनेतर्फे आयोजित जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेत एकेरी व दुहेरी प्रकारात अजिंक्यपद पटकावत राघव धुमकने दुहेरी मुकुट मिळवला. वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या कोर्टवर झालेल्या स्पर्धेत संस्कृती सातारकर, चंद्राशू गुंडले, सारा साळुंके, उदयन देशमुख, आदित्य बेंबडे यांनी उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक राखला.

विजेत्या खेळाडूंना राज्य बॅडमिंटन संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष शिरीष बाेराळकर, जिल्हा संघटनेचे सचिव सिद्धार्थ पाटील, गुरमितसिंग यांच्या हस्ते बक्षीस प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतुल कुलकर्णी व आभारप्रदर्शन हिमांशू गोडबोले यांनी केले. खेळाडूंना नियमित सरावासाठी मोठ्या प्रमाणात शटल लागतात. खेळाडूंना मदतीसाठी जिल्हा संघटनेतर्फे प्रशिक्षकांना शटलचे बॉक्स वितरित करण्यात आले.

मुलांच्या १५ वर्ष गटाच्या अंतिम लढतीत राघव धुमकने तीन सेटपर्यंत रंगलेल्या रोमांचक सामन्यात सार्थक नलावडेला हरवले. राघवने पहिला सेट २१-१२ ने आपल्या नावे केला. त्यानंतर सार्थकने उत्कृष्ट स्मॅश मारत १६-२१ ने दुसरा सेट जिंकला. अखेरच्या सेटमध्ये राघवने २१-११ ने सामना आपल्या खिशात घातला.

अंतिम निकाल पुढीलप्रमाणे ११ वर्ष मुले - चंद्राशू गुंडले वि.वि. आरव इंगोले (२१-१४, २१-१५). १३ वर्षे - उदयन देशमुख वि.वि. आदित येनगे रेड्डी (२१-०८, २१-११). १७ वर्षे - आदित्य बेंबडे वि.वि. देवांश बडवे (१७-२१, २२-२०, २१-१५). १३ वर्षे दुहेरी - आदित्य येनगे रेड्डी व अर्णव आपटे वि.वि. स्वस्तीद येनगे रेड्डी व गौरव पाटील (२१-०८, २१-११). ११ वर्षाखालील मुली - परिधी बोडखे वि.वि. वृंदा मणियार (२१-१०, २१-११). १३ वर्षे - सृष्टी मुळे वि.वि. हिने नैनिका रिंगणगावकर (२१-१८, २१-११) आणि १५ वर्षे - सारा साळुंके वि.वि. वृषाली तडमदगे (१९-२१, २१-०३, २१-१०).

बातम्या आणखी आहेत...