आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य तलवारबाजी स्‍पर्धा:छत्रपती संभाजीनगर संघाला दुहेरी विजेतेपद

छत्रपती संभाजीनगर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी संघटना व नाशिक जिल्हा तलवारबाजी संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ३३ व्या वरिष्ठ राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा संघाने मुलामुलींच्या गटात विजेतेपद पटकावले. कोल्हापूर मुलांनी उपविजेतेपद व लातूर संघ तृतीय स्थान मिळवले. मुलींमध्ये द्वितीय रायगड व लातूर संघाने तृतीय स्थान मिळवले आहे. सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंची पुणे येथील राष्ट्रीय स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ९ खेळाडूंची महाराष्ट्र संघात निवड झाली. खेळाडूंचे साईचे संचालक नितीन जयस्वाल, राज्य संघटनेचे सचिव डॉ. उदय डोंगरे, जिल्हा अध्यक्ष. एस. पी. जवळकर, डॉ. दिनेश वंजारे यांनी अभिनंदन केले.

विजेते खेळाडू : फाॅइल - तेजस पाटील (सुवर्ण), शाकीर सय्यद (कांस्य). मुली - वैदेही लोहिया (सुवर्ण). इप्पी - ऋषभ जाधव (सुवर्ण), स्नेहल पाटील (कांस्य). सेबर - अभय शिंदे (सुवर्ण), निखिल वाघ (कांस्य). मुली - कशिश भराड (सुवर्ण), हर्षदा वंजारे (कांस्य).
फाॅइल संघ - शाखेर सय्यद, तेजस पाटील, ओम वाघ, गौरव गोटे (सुवर्ण). मुली - वैदेही लोहिया, हर्षदा वंजारे, हर्षदा वडते, मानसी हुलसुरकर (कांस्य).

फाॅइल - तेजस पाटील (सुवर्ण), शाकीर सय्यद (कांस्य). मुली - वैदेही लोहिया (सुवर्ण). इप्पी - ऋषभ जाधव (सुवर्ण), स्नेहल पाटील (कांस्य). सेबर - अभय शिंदे (सुवर्ण), निखिल वाघ (कांस्य). मुली - कशिश भराड (सुवर्ण), हर्षदा वंजारे (कांस्य). फाॅइल संघ - शाखेर सय्यद, तेजस पाटील, ओम वाघ, गौरव गोटे (सुवर्ण). मुली - वैदेही लोहिया, हर्षदा वंजारे, हर्षदा वडते, मानसी हुलसुरकर (कांस्य).

बातम्या आणखी आहेत...