आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Dream 11 Will Be The New Title Sponsor Of IPL; The New Contract Will Be For Only 4 And A Half Months

आयपीएल 2020:222 कोटी रुपयांत ड्रीम 11 ने मिळवली आयपीएल टायटल स्पॉन्सरशिप; फक्त साडे 4 महीन्यांचा असेल नवीन कॉन्ट्रॅक्ट

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मंगळवारी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)चा आगामी टायटल स्पॉन्सर म्हणून ड्रीम 11 ची घोषणा केली आहे. चिनी मोबाईल कंपनी, व्हिव्होसोबत 2018 मध्ये 5 वर्षांसाठी करण्यात आलेला करार बोर्डाने नुकताच रद्द केला. बीसीसीआयला व्हिव्होकडून वर्षाला 440 कोटी रुपये मिळायचे, तर ड्रीम 11 कडून या वर्षी बीसीसीआयला 222 कोटी रुपये दिले जातील.

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) चे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी पुष्टी केली की ड्रीम 11 बीसीसीआयला 222 कोटी रुपये देईल. सूत्रांनी सांगितल्यानुसार लिलावात ड्रीम 11 ने अनएकेडमी आणि बायजूपेक्षा जास्त बोली लावली. व्हिव्होसोबत करार रद्द झाल्यानंतर अत्यंत कमी वेळात बीसीसीआयकडे नवीन स्पॉन्सर शोधण्याचे आव्हान होते. आयपीएलची लोकप्रियता पाहता, अनेक ब्रँड्सने टायटल स्पॉन्सर होण्यात रस दाखवला होता. पण, ड्रिम 11 ने बाजी मारली. 2020 च्या टुर्नामेंटसाठी करण्यात आलेला टायटल स्पॉन्सरशिपचा करार हा 5 महिन्यांपेक्षा जास्त काळाचा नसेल.

या कराराने टुर्नामेंटमधील आठही फ्रँचायझींचे नुकसान होणार आहे. कारण, मिळणाऱ्या रकमेतील 50% बीसीसीआय आपल्याजवळ ठेवतो तर उर्वरित रक्कम सर्व संघात समान वाटली जाते. 2019 मध्ये प्रत्येक संघाला 55 कोटी रुपये मिळाले होते, पण यावर्षी फक्त 27.75 कोटी रकमेवर समाधान मानावे लागेल.

बातम्या आणखी आहेत...