आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराटी-२० च्या झटपट क्रिकेटसाठी दुबई सज्ज झाली आहे. १३ जानेवारीपासून इथे आयएलटी २० (इंटरनॅशनल लीग टी-२०) साठी सहा संघांमध्ये सामने होतील. दुबई लीगच्या या सहा संघांपैकी पाच संघांचे मालक भारतीय आहेत. मुकेश अंबानींचा रिलायन्स, गौतम अदानींचा स्पोर्ट््सलाइन व शाहरुख खानचा नाइट रायडर्स संघ मैदानात दिसेल. प्रत्येक संघाला जवळपास २१ कोटींचा सॅलरी कॅप दिला आहे. आयपीएलनंतर आयएलटी ही सर्वात श्रीमंत स्पर्धा बनली आहे. टॉप खेळाडू श्रेणीसाठी ३.७२ कोटी रुपयांची कमाल मर्यादा ठेवण्यात आली आहे. दुबई लीगमध्ये खेळाडूंसाठी ऑफरही आहेत. खेळाडू लीगद्वारे करत असलेली कमाई करमुक्त करण्याची सर्वात मोठी घोषणा करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीगमध्ये खेळाडू प्रत्येक सत्रामध्ये १.९६ कोटी रुपये इतकीच कमाई करू शकतात. मात्र, स्टेडियम-टीव्हीचे प्रेक्षक हा या लीगसाठी सर्वात मोठा अडथळा आहे. १२ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या दुबई लीगचे वेळापत्रक बिग बॅश आणि दक्षिण आफ्रिकेच्या लीगसोबतच येत आहे. टीम इंडियाचे दिग्गज खेळाडूही व्यग्र वेळापत्रकामुळे दुबई लीगमध्ये खेळू शकणार नाहीत.
लीगचा फॉरमॅट : राउंड-रॉबिनमध्ये प्रत्येक संघ दुसऱ्या संघासोबत दोनदा खेळेल. ३० लीग मॅच, चार प्लेऑफ होतील. दुबईत १६, अबुधाबीत १० व शारजाहमध्ये ८ सामने होतील. प्रत्येक संघात संयुक्त अरब अमीरातीचे ४ खेळाडू असतील.
बॉलीवूड शो : लीगच्या उद्घाटन सोहळ्यात बॉलीवूडचा प्रसिद्ध रॅपर बादशहा आणि आरअँडबी सिंगर जेसन डेरुलो सादरीकरण करतील. यूएई बोर्डाचे उपाध्यक्ष खालिद अल जरूनी सांगतात, यूएईचे खेळाडू या लीगद्वारे ओळख निर्माण करतील.
टूर पॅकेज : गल्फ ट्रॅव्हलच्या जीएम एलार्ना कार्वेल म्हणतात, भारतातून येणारे पर्यटक दुबईतील सामन्यांचा पॅकेजमध्ये समावेश करण्याची मागणी करत आहेत. दुबई लीगमुळे जानेवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यानंतर इथे दर आठवड्याला २० लाख पर्यटक येण्याची शक्यता आहे.
कॅरेबियन खेळाडूंचा दबदबा
गल्फ जायंट्स (अदानींचा संघ) : ख्रिस जॉर्डन, हेटमायर, लियाम डॉसन, जेम्स विन्स
एमआय अमिरात (अंबानींचा संघ) : पोलार्ड, ड्वेन ब्राव्हो, निकोलस पूरण, इम्रान ताहिर
आबुधाबी नाइट रायडर्स (शाहरुखचा संघ) : सुनील नरेन, आंद्रे रसेल, जॉनी बेयरस्टो, पॉल स्टर्लिंग, लाहिरू कुमार, कॉलिन इन्ग्राम
दुबई कॅपिटल्स (जीएमआर) : रॉबिन उथप्पा, रोमन पॉवेल, दुष्मंथा चमिरा, मुजीब-उर-रहमान
शारजा वाॅरियर्स (राजेश शर्मांचा संघ) : मोईन अली, डेव्हिड मलान, एविन लुईस, नबी
डेझर्ट व्हायपर्स (अमेरिकन संघ) : कॉलिन मुनरो, टॉम करन, बेन डकेट, वनिंदू हसरंगा
{फ्रँचायझी संघांत ८४ आंतरराष्ट्रीय आणि २४ यूएईचे खेळाडू सहभागी केले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.