आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Daniil Medvedev Wins Dubai Title; Medvedev Wins Third Straight Title | Andrey Rublev | Daniil Medvedev

मेदवेदेवने जिंकले 3 आठवड्यांत सलग तिसरे विजेतेपद:दुबई टेनिस चॅम्पियनशिपमध्ये गतविजेत्या आंद्रे रुबलेव्हचा केला पराभव

25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबईपूर्वी मेदवेदेवने दोहा आणि रॉटरडॅमचे विजेतेपदही पटकावले आहे. - Divya Marathi
दुबईपूर्वी मेदवेदेवने दोहा आणि रॉटरडॅमचे विजेतेपदही पटकावले आहे.

रशियन स्टार डॅनियल मेदवेदेव याने दुबई टेनिस चॅम्पियनशिप जिंकली आहे. 27 वर्षीय मेदवेदेवने अंतिम फेरीत त्याच्याच देशातल्या आंद्रे रुबलेव्हचा 6-2 6-2 असा पराभव केला. गेल्या तीन आठवड्यांतील डॅनियलचे हे सलग तिसरे विजेतेपद आहे. यापूर्वी त्याने दोहा आणि रॉटरडॅम स्पर्धा जिंकल्या आहेत.

2021 नंतर सलग तीन विजेतेपद जिंकणारा मेदवेदेव हा तिसरा खेळाडू आहे. त्याच्या आधी, जुलै 2021 मध्ये कॅस्पर रुड आणि ऑक्टोबर 2022 मध्ये फेलिक्स ऑगर-अलियासिम यांनी असे केले आहे.

नोव्हाक जोकोविचला उपांत्य फेरीत तब्बल 3 वर्षांनी पराभव पत्करावा लागला.
नोव्हाक जोकोविचला उपांत्य फेरीत तब्बल 3 वर्षांनी पराभव पत्करावा लागला.

मेदवेदेवने 22 वेळचा ग्रँडस्लॅम नोव्हाक जोकोविचचा पराभव केला

मेदवेदेवने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत 22 वेळचा ग्रँडस्लॅम विजेता नोव्हाक जोकोविचचा एकतर्फी सामन्यात पराभव केला. त्याने दोन्ही सेट 6-4, 6-4 असे जिंकले आणि जोकोविचला पुनरागमनाची संधी दिली नाही. मेदवेदेवने जोकोविचविरुद्ध तब्बल 3 वर्षांनी विजय मिळवला आहे. दोन्ही खेळाडू 14 वेळा आमनेसामने आले आहेत. मेदवेदेवचा जोकोविचवरचा हा 5वा विजय आहे.

रुबलेव्हने जर्मनीच्या ज्वेरेव्हचा पराभव करून अंतिम फेरी गाठली

आंद्रे रुबलेव्हने जर्मनीच्या अलेक्झांडर ज्वेरेव्हचा पराभव करून दुबई टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत दुसऱ्यांदा प्रवेश केला. रुबलेव्हने पहिला सेट 6-3 असा सहज जिंकला, पण दुसरा सेट जिंकण्यासाठी त्याला संघर्ष करावा लागला. त्याने दुसरा सेट 7-6 असा जिंकला.

बातम्या आणखी आहेत...