आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गेम प्लॅन:देशांतर्गत क्रिकेट, एनसीए, आयपीएलमुळे भारतीय संघ जगात सर्वोत्तम

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आमची देशांतर्गत कार्यप्रणाली मजबूत, संघ निवड पारदर्शक- सौरव गांगुली

भारत सध्या जागतील सर्वोत्कृष्ट संघ आहे. ऑस्ट्रेलियामध्ये कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत कसोटी मालिका जिंकल्याचे ताजे उदाहरण आहे. विश्वविजेता इंग्लंडला भारत दौऱ्यात तिन्ही फाॅरमॅटमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलींच्या मते, पाच कारणांमुळे भारतीय संघ चांगली कामगिरी करतोय.

गांगुलींनी म्हटले की,‘देशातर्गंत क्रिकेट, एनसीए व प्रशिक्षकांमुळे आमची कार्यप्रणाली मजबूत आहे. आयपीएलही एक कारण असून संघ निवडीत पारदर्शकता आहे. योग्य खेळाडूंची निवड केली जाते. चार दिवसांचे सामने व टी-२० सामने वेगळे होतात. त्यामुळे आत्मविश्वास मिळतो, तुम्हाला कुठल्याही स्तरावर खेळण्याचा.’ भारतीय संघ २ जुन राेजी इंग्लंड दौऱ्यावर रवाना हाेईल.

प्रत्येक वयाेगटासाठी दर्जेदार अांतरराष्ट्रीय काेचची नियुक्ती; अायपीएलमुळे युवा खेळाडूंना दर्जेदार कामगिरीची संधी

1. देशांतर्गत क्रिकेट : देशातील स्थानिक क्रिकेटची पद्धत, प्रमुख कारण आहे. खेळाडू प्रथम श्रेणी व मर्यादित षटकांचे एकूण ३० सामने खेळतात. रणजी ट्रॉफीने भारतीय संघाला मयंक, सिराज, शार्दूलसारखे खेळाडू दिले. चेतेश्वर पुजारा, लोकेश राहुल, अजिंक्य रहाणे भारतीय संघातील प्रमुख खेळाडू स्थानिक स्पर्धेत खेळतात. त्यामुळे खेळाडूंचा दर्जा उंचावतो व त्यांना आव्हान मिळते. 2. एनसीए: बंगळुरू येथील नॅशनल क्रिकेट अकादमी (एनसीए)सर्वाेत्कृष्ट आहे. येथील काम हे एमआरएफ पेस अकादमी सोबत चालते. त्या माध्यमातून नवदीप सैनी, सिराज, खलील सारख्या वेगवान गोलंदाजांना कामगिरीचा दर्जा उंचावता अाला. सध्या राहुल द्रविड त्याचे प्रमुख आहेत. भारतीय संघातील सर्व युवा खेळाडू आपल्या कामगिरीचे श्रेय राहुल द्रविडला देतात. 3. जागतिक दर्जाचे प्रशिक्षक : राष्ट्रीय संघच नव्हे तर प्रत्येक वयोगटासाठी बीसीसीआयने जागतिक दर्जाच्या काेचची नियुक्ती केली. द्रविड १९ वर्षांखालील व अ संघाचा प्रशिक्षक होता. भरत अरुण, रमण, रवी शास्त्रीसारखे प्रशिक्षक युवा खेळाडूंना तयार करत आहेत. राज्य स्तरावरही आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक आहेत, जसे केरळचे प्रशिक्षक ऑस्ट्रेलियाचे डेव व्हाटमोर आहेत. 4. आयपीएल: २००८ मध्ये सुरू झालेली आयपीएल भारतीय क्रिकेटसाठी यशाचा मार्ग ठरली. याने स्थानिक व नवख्या खेळाडूंना व्यासपीठ मिळाले. युवांना दिग्गज खेळाडूंसोबत दर्जेदार कामगिरी कररण्याची संधी मिळते. हे सर्व युवा स्वत:ला सिद्ध करण्यासाठी उत्सुक असतात. संजू सॅमसन, हार्दिक, कृणाल, बुमराह आणि आता सूर्यकुमार, ईशान किशन आयपीएलमधून पुढे आले आहेत. 5. संघ निवड: भारताकडे प्रचंड गुणवत्ता असलेली फळी आहे. एकाच वेळी दोन द्विपक्षीय मालिका खेळणे, याचे मोठे उदाहरण आहे. संघाकडे प्रत्येक स्थानासाठी ३-४ दावेदार आहेत. २४ खेळाडू इंग्लंड दौऱ्यावर आहेत. सर्वांना कामगिरीच्या आधारे स्थान मिळाले आहे. कर्णधार व उपकर्णधारही इंग्लंड दौऱ्यात असतील. त्याचबरोबर श्रीलंका दौऱ्यासाठी अनेक दावेदार आहेत.

बातम्या आणखी आहेत...