आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Duleep Trophy Will Be Played From June 28; Ranji Trophy To Be Organized In January

महिलांच्या राष्ट्रीय टी-20 स्पर्धेचेही यंदा आयाेजन:दुलीप ट्राॅफी 28 जूनपासून रंगणार; रणजी ट्राॅफीचे जानेवारीत आयाेजन

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ५ जानेवारी २०२४ पासून रणजी ट्राॅफीला सुरुवात

दुलीप ट्राॅफीने यंदाच्या २०२३-२४ च्या देशांतर्गत क्रिकेट सत्राला सुरुवात हाेत आहे. २८ जूनपासून या स्पर्धेला सुरुवात हाेणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वतीने या सत्रातील क्रिकेट स्पर्धा आयाेजनाची घाेषणा केली आहे. यामध्ये महिलांच्या राष्ट्रीय टी-२० स्पर्धेच्याही आयाेजनाचा समावेश आहे.

तसेच रणजी ट्राॅफी क्रिकेट स्पर्धा ५ जानेवारी २०२४ पासून रंगणार आहे. त्याआधी युवांना दुलीप ट्राॅफी, देवधर ट्राॅफी (लिस्ट ए ) आणि इराणी चषकाच्या माध्यमातून रणजी ट्राॅफीची तयारी करता येणार आहे. २८ जूनपासून दुलीप ट्राॅफी क्रिकेट स्पर्धेचा थरार रंगणार आहे. त्यानंतर लगेच २८ जुलै ते ३ आॅगस्टदरम्यान देवधर ट्राॅफी क्रिकेट स्पर्धा आयाेजित करण्यात आली. तसेच इराणी चषक १ ते ५ आॅक्टाेबरदरम्यान आयाेजित करण्यात आला आहे. त्यापाठाेपाठ देशांतर्गत टी-२० फाॅरमॅटच्या सय्यद मुश्ताक अली चषक क्रिकेट स्पर्धेला १६ आॅक्टाेबरपासून सुरुवात हाेणार आहे. या स्पर्धेची फायनल ६ नाेव्हेंबर राेजी हाेणार आहे. यादरम्यान विजय हजारे ट्राॅफीला सुरुवात हाेणार आहे. ही स्पर्धा २३ नाेव्हेंबर ते १५ डिसेंबरदरम्यान आयाेजित करण्यात आली आहे. रणजी ट्राॅफी स्पर्धा तब्बल ७० दिवसांपर्यंत चालणार आहे. २३ फेब्रुवारी ते १४ मार्च २०२४ दरम्यान नाॅकआऊट सामने हाेतील. विश्वचषकादरम्यान महिलांची स्पर्धा : भारतात यंदा आॅक्टाेबर-नाेव्हेंबरदरम्यान वनडेचा विश्वचषक हाेणार आहे. याचदरम्यान बीसीसीआयच्या वतीने महिलांच्या टी-२० राष्ट्रीय स्पर्धेचे आयाेजन केले जाईल. तसेच यादरम्यान इंटर झाेनल टी-२० ट्राॅफीचेही आयाेजन करण्यात आले आहे. याचीही आता घाेषणा करण्यात आली.