आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • During The India Pakistan Match, The Food Of Both The Countries In One Plate, Celebration Of Mahasagramma In Dubai Sharjah

आशिया कप:भारत-पाक सामन्यावेळी दोन्ही देशांचे खाद्यपदार्थ एकाच थाळीत, दुबई-शारजाहमध्ये महासंग्रामाचा उत्सव

दुबई / शानिर एन सिद्दिकी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये रविवारी भारत-पाक क्रिकेट सामना होत आहे. सर्व २५ हजार तिकिटांची विक्री झाली आहे. मोठ्या संख्येने भारतीय आणि पाकिस्तानी पाहुणे आले आहेत. दुबई आणि शारजाहमधील हॉटेल्स भरली आहेत. बार आणि रेस्टॉरंटमध्ये मोठे स्क्रीन लावण्यात आले आहेत. दुबईतील रेस्टॉरंट्स गाणे आणि संगीतासोबत भाेजन करताना सामने पाहण्यासाठी अनेक ऑफर दिल्या जात आहेत. दुबईत दुपारी शुक्रवारी १२ पासून ते रविवारपर्यंत साप्ताहिक सुट्टी असल्याने कार्यालये बंद असतात. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत भारत-पाक सामना पाहण्यासाठी रविवारी बार आणि रेस्टॉरंट बुक केली आहेत. अनेक ठिकाणी ढोल-ताशांची व्यवस्था आहे. एकंदरीत दुबईत उत्सवाचे वातावरण आहे. आशिया चषक स्पर्धेतील १३ पैकी ९ सामने येथे खेळवले जाणार आहेत. १६ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेची सुरुवात शनिवारी श्रीलंका आणि अफगाणिस्तान सामन्याने होणार आहे, पण खरी उत्सुकता भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याची आहे. जवळपास ४० लाख भारतीय आणि पाकिस्तानी अमिरातीला त्यांचे दुसरे घर मानतात. शारजाह-दुबईत हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सने अनेक ऑफर्स आणल्या आहेत. काही हॉटेल्सनी तर आशिया चषक खाद्यपदार्थ नव्याने सादर केले आहेत.

शारजाच्या ‘किंग-हाऊस ऑफ मुघलाई फूड’चे मालक अदीब अहमद म्हणतात, “आम्ही खास सामन्याच्या दिवसासाठी आशिया चषका नावाने खाद्यपर्थांची रचना केली आहे. त्यात एकाच थाळीत भारतीय खाद्यपदार्थंासोबत पाकिस्तानी खाद्यपदार्थांचे मिश्रण असेल. लखनवी कबाब, पाकिस्तानी खीर, पेशावरी चिकन, मलबार पराठ्यांसोबत शाकाहारी पदार्थही दिले जातील. दोन्ही देशांच्या संगीताचीही व्यवस्था करण्यात आली आहे. दुबईच्या ‘हाय नोट पूल’ आणि ‘स्काय लाउंज’वर मोठ्या स्क्रीनवर भारत-पाक सामन्याचे थेट प्रक्षेपण होणार आहे. इथे पार्टीबराेबरच सामना पाहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. हाय नोटचे सीईओ हरी केमल सांगतात की आम्ही सतत अागऊ नोंदणी स्वीकारत आहोत आणि त्यानुसार स्क्रीनची संख्या वाढवत आहोत. एका म्युझिक लाउंजने सामन्यादरम्यान भारतीय आणि पाकिस्तानी संगीताची व्यवस्था केली आहे. भारतीय संघाचा समर्थक फैजान खान म्हणाला, माझ्या कार्यालयातील संपूर्ण गट हा सामना पाहणार आहे. सामन्याची तिकिटे मिळविणे व स्टेडियममध्ये ताे पहाणे अवघड होते, म्हणून आम्ही मित्रांनी स्पोर्ट्स बारमध्ये मोठ्या स्क्रीनवर सामना पाहण्यासाठी नोंदणी केली. ओम शर्मा म्हणतात, मी खूप प्रयत्न केले, पण तिकीट मिळाले नाही. आता मी रेस्टॉरंटच्या मोठ्या स्क्रीनवर माझ्या कुटुंबासोबत सामन्याचा आनंद घेईन.

कर्मचाऱ्यांना मोफत तिकिटे, स्क्रीनवरही थेट प्रक्षेपण आशिया चषकाच्या पहिल्या सामन्याच्या तिकिटांची विक्री १५ ऑगस्टपासून सुरू झाली, ती तीन तासांतच विकली गेली. बाकीच्या तिकिटांचेही तेच झाले. यानंतर डॅन्यूब ग्रुपचे उपाध्यक्ष आणि मिस्टर क्रिकेट म्हणून प्रसिद्ध असलेले अनीस साजन यांनी त्यांच्या कंपनीच्या ब्लू कॉलर कर्मचाऱ्यांना सामन्यांची तिकिटे दिली. इतर कंपन्यांनीही स्क्रीनवर थेट प्रक्षेपणाची व्यवस्था केली.

बातम्या आणखी आहेत...