आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • E Auction Of Prime Minister Narendra Modi's Mementos Neeraj Chopra's Javelin Sold For 1.5 Crore Rupees, Bhavani's Sword And Paralympic Athlete Sumit's Javelin Also Cost More Than One Crore

मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव:नीरज चोप्राच्या भाल्याला मिळाली सर्वाधिक किंमत! ऑनलाइन ऑक्शनमध्ये भवानीची तलवार आणि सुमितच्या भाल्याला एक कोटींपेक्षा अधिक भाव

नवी दिल्ली8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंचा ऑनलाइन लिलाव झाला. त्यामध्ये कोणत्या वस्तूला किती किंमत मिळाली याची माहिती आता समोर आली आहे. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवलेल्या नीरज चोप्राच्या भाल्याला सर्वाधिक दीड कोटी रुपये मिळाले आहेत. यासोबतच, भवानी देवी यांचे ऑटोग्राफ असलेल्या फेन्सिंगच्या तलवारीचा सव्वा कोटी रुपयांत लिलाव करण्यात आला आहे.

पीएम मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंच्या ऑनलाइन लिलावाची अंतिम तारीख गुरुवारी संपली. हा लिलाव ई-ऑक्शनच्या माध्यमातून करण्यात आला होता. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भाला फेक या प्रकारात नीरज चोप्राने भारताला गोल्ड मेडल मिळवून दिला. देशात परतल्यानंतर त्याने तोच भाला पीएम मोदींना भेट म्हणून दिला. यासोबतच पीव्ही सिंधू आणि पहिल्यांदाच ऑलिम्पिक तलवारबाजीत देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भवानी देवी यांच्यासह अनेक खेळाडूंनी पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांना गिफ्ट दिले होते.

नीरज चोप्राच्या भाल्याची ऑनलाइन किंमत 80 हजार रुपये आहे. पण, त्याला लिलावात दीड कोटी रुपये मिळाले आहेत. याबरोबरच भवानी देवीने ऑटोग्राफ केलेल्या फेन्सिंगच्या तलवारीला सुद्धा चांगलीच किंमत मिळाली. लिलावात ही तलवार 1.25 कोटी रुपयांत विकली गेली आहे.

सुमित अंतिलच्या भाल्याला 1 कोटी 2 लाख रुपये
ब्राँझ मेडल मिळवलेल्या पीव्ही सिंधूच्या रॅकेटला 80 लाख रुपये मिळाले आहेत. टोक्यो पॅरालिंपिकमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंनी सही केलेले ड्रेस 1 कोटी रुपयांत विकले गेले. पॅरालिंपिक भालाफेकमध्ये गोल्ड मेडल मिळवणाऱ्या सुमित अंतिलच्या भाल्याला 1 कोटी 2 लाख रुपये मिळाले आहेत. तर बॉक्सिंगमध्ये ब्राँझ मिळवणाऱ्या लवलीना हिंच्या ग्लव्ससाठी एकाने 91 लाख रुपये मोजले आहेत.

1300 भेटवस्तूंचा झाला लिलाव
सांस्कृतिक मंत्रालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंचे लिलाव आयोजित केले होते. ऑनलाइन पद्धतीने 17 सप्टेंबरपासून लिलाव खुले करण्यात आले होते. 7 ऑक्टोबर रोजी लिलावाची अंतिम तारीख होती. यामध्ये जवळपास 1300 भेटवस्तूंचा समावेश होता.

नमामि गंगे मिशनला दान
ई-ऑक्शनच्या माध्यमातून मिळालेली रक्कम नमामि गंगे मिशनला दान केली जाणार आहे. तत्पूर्वी 2019 मध्ये नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टने काही वस्तूंचा लिवाव केला होता. त्यातून मिळालेली रक्कम सुद्धा नमामि गंगे मिशनला दान करण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...