आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिखर धवनचे कुशल नेतृत्व आणि मालिकावीर शुभमान गिलच्या (एकूण २०५ धावा) झंझावाताच्या बळावर टीम इंडियाने बुधवारी मध्यरात्री यजमान विंडीजला तिसऱ्या वनडेत धूळ चारली. भारताने डीएलनुसार ११९ धावांनी विजय संपादन केला. यासह भारताने तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत विंडीजचा ३-० ने सुफडा साफ केला. आता हाच मालिका विजयाचा कित्ता गिरवण्यासाठी राेहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आज शुक्रवारपासून टी-२० सिरीजमध्ये खेळणार आहे. यजमान विंडीज आणि भारत यांच्यातील पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात हाेत आहे. त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियमवर रात्री ८.०० वाजेदरम्यान सलामीच्या सामन्यात हे दाेन्ही संघ समाेरासमाेर असतील. मालिकेतील या पाच टी-२० सामन्यांतून आगामी वर्ल्डकपसाठी आठ जणांना भारतीय संघातील आपला प्रवेश निश्चित करता येणार आहे. त्यामुळे खेळाडूंसाठी ही मालिका महत्त्वाची मानली जात आहे. आॅस्ट्रेलियामध्ये टी-२० विश्वचषकाचे आयाेजन करण्यात आले. यासाठी भारताचे १२ खेळाडू निश्चित आहेत.
विराट काेहली ठरताेय सातत्याने फ्लाॅप; तिसऱ्या स्थानासाठी बॅकअपची गरज
भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट काेहली सध्या सातत्याने अपयशी ठरत आहे. भारतीय संघाने विश्वचषकापूर्वी १६ टी-२० सामने खेळणार आहे. यातूनच विश्वचषकासाठीचा संघ निश्चित केला जाईल. त्यामुळे काेहलीच्या अपयशामुळे तिसऱ्या स्थानासाठी बॅकअपचा शाेध सुरू आहे. याच आगामी सामन्यातून हा तिसऱ्या स्थानासाठीचा मजबूत बॅकअप निश्चित केला जाईल. यासाठी सध्या श्रेयस अय्यर आणि दीपक हुडा यांच्यात चुरस लागली आहे.
५ महिने, सलग दुसऱ्यांदा विंडीजचा सुपडा साफ
भारतीय संघाने अवघ्या पाच महिन्यांत विंडीज संघाचा वनडे मालिकेत सुपडा साफ केला. भारताने तिसऱ्या वनडेत ११९ धावांनी विजयाची नाेंद केली. यासह भारताला ही तीन वनडे सामन्यांची मालिका ३-० ने आपल्या नावे करता आली. भारताचा हा सलग दुसरा माेठा मालिका विजय ठरला. राेहितच्या नेतृत्वात भारताने याच सत्रात फेब्रुवारी महिन्यात विंडीजविरुद्धची वनडे मालिका ३-० ने जिंकली हाेती.
आठ खेळाडूंमध्ये रंगणार तिसऱ्या स्थानासाठी चुरस १. कुलदीप यादव : आयपीएलमध्ये सर्वाेत्तम कामगिरी केल्यानंतर सध्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. पुनरागमन करत टी-२० मध्ये दर्जेदार खेळीतून वर्ल्डकप प्रवेश निश्चित हाेईल. २.अक्षर पटेल : विंडीजविरुद्ध दुसऱ्या वनडेत मॅचविनिंग खेळी केली. मात्र, विश्वचषकासाठी जडेजाचा माेठा अडसर आहे. ३. श्रेयस अय्यर : विंडीजमध्ये चांगली खेळीनंतरही शाॅर्ट-बाॅलवरील अपयशीने विश्वचषक स्पर्धेसाठीची आशा धुसर आहे. ४. दिनेश कार्तिक : आयपीएलमधील लक्षवेधी खेळीनंतर इंग्लंड दाैऱ्यावरील अपयशाचा आता माेठा अडसर निर्माण झाला. आता फिनिशरच्या भूमिकेने लक्ष वेधू शकताे. ५. अर्शदीप सिंग : भारतीय संघाकडे गाेलंदाजीत अनेक पर्याय असल्याने अर्शदीपच्या वाटेला कमी संधी येत आहे. त्याची इंग्लंडविरुद्ध एकमेव सामन्यातील कामगिरी लक्षवेधी ठरली. त्याने धावांना ब्रेक लावत दाेन बळी घेतले. ६. आवेश खान : आयपीएल सुपरस्टारआंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वात महागडा गाेलंदाज ठरला. कामगिरीत सातत्याचा अभाव. मात्र, त्याच्यापेक्षा शार्दूल सरस. ७. अश्विन : टी-२० माेहिमेत नसतानाही संधी मिळाली. शेवटचा सामना गत वर्षी खेळला हाेता. आता आपली क्षमता सिद्ध करत प्रवेश निश्चित करता येईल. ८. दीपक हुडा : तिसऱ्या स्थानाी काेहलीसाठी सर्वाेत्तम पर्याय म्हणून सध्या दीपकची कामगिरी काैतुकास्पद ठरत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.