आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • El Clasico Of Cricket: Mumbai Indians And Chennai Superkings; Most Successful Teams Of Both League

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

क्रिकेटचा एल क्लासिको:मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज; लीगमधील सर्वात यशस्वी संघ, मुंबईने 4 तर चेन्नईने 3 वेळा ट्रॉफी आपल्या नावे केली

8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एप्रिल 2018 पासून मुंबई-चेन्नई दरम्यान 5 सामने झाले आहेत, सर्व मुंबईने जिंकले

आयपीएलचे 13 वे सीजन आजपासून सुरू होत आहे. पहिला सामना डिफेंडिंग चँपियन मुंबई इंडियंस आणइ रनरअप चेन्नई सुपरकिंग्सदरम्यान आहे. या दोन्ही संघांमध्ये होणाऱ्या सामन्यांना एल क्लासिको म्हटले जाते, कारण दोन्ही संघ लीगमधले सर्वात यशस्वी संघ आहेत. एल क्लासिको स्पॅनिश शब्द आहे, ज्याचा अर्थ 'उत्कृष्ट' असा होतो. स्पॅनिश फुटबॉलमध्ये बार्सिलोना-रियल मॅड्रिडदरम्यान होणाऱ्या सामन्याला एल क्लासिको म्हटले जाते, कारण दोन्ही संघ ला लिगा मधले सर्वात यशस्वी क्लब आहेत. मुंबई आणि चेन्नईमध्ये मुंबईला दमदार दावेदार मानले जात आहे. कारण, दोन्ही संघात झालेल्या शेवटचे पाच सामने मुंबईने जिंकले आहेत.

हा आहे टर्निंग पॉइंट

चेन्नईमध्ये स्पिन गोलंदाज चांगले आहेत. मुंबई लवकर विकेट पडल्यानंतर हार्दिक आणि पोलार्डपूर्वी क्रुणालला पाठवते. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट ब्रावोवरही हार्दिक-पोलार्ड भारी पडतात. दोघांनी ब्रावोविरुद्ध 185 धावा केल्या आहेत.

टॉस महत्वपूर्ण, पण चेन्नईचा कर्णधार धोनीसाठी निर्णय घेणे सोपे नाही. अबु धाबीची खेळपट्टी एकदम स्लो समजली जाते. त्यामुळे टॉस जिंकणाऱ्या टीम पहिल्यांदा फलंदाजीला उतरू शकतात. यातही दव पडण्याची शक्यता असल्यामुळे चेन्नईच्या स्पिनर्सला गोलंदाजी करताना त्रास होऊ शकतो. त्यामुळेच टॉस जिंकूनही धोनीसाठी निर्णय घेणे सोपे नसेल.

चेन्नईसाठी फलंदाजी तर मुंबईसाठी स्पिन गोलंदाज चिंतेचा विषय

चेन्नईसाठी फलंदाजी चिंतेचा विषय आहे. मागच्या सीजनमध्ये चेन्नईने पहिल्या सहा ओव्हरमध्ये 30 विकेट्स गमावल्या होत्या. यादरम्यान सर्वात कमी 6.44 रनरेट होता. मुंबईचे स्पिनर मागच्या दोन सीजनमध्ये टीमसाठी 190 पैकी फक्त 55 विकेट्स घेऊ शकले आहेत. हे सर्व आठ संघात सर्वात कमी आहे. चेन्नईच्या स्पिनर्सनी 210 पैकी 90 विकेट्स घेतल्या आहेत. मागच्या दोन सीजनबाबत बोलायचे झाले, तर चेन्नईने 6 ओव्हरमध्ये सर्वात जास्त 56 विकेट्स घेतल्या आहेत. मुंबई 40 विकेट्स घेऊन चौथ्या स्थानावर आहे.

मुंबईचे गोलंदाज पहिल्या सहा ओव्हरमध्येच चेन्नईवर दबाव टाकू शकतात

चेन्नईने मागच्या सीजनमध्ये होम ग्राउंडवर 6 संघांना हरवले पण मुंबईकडून दोन वेळा पराभव मिळाला. 2019 मध्ये दोन्ही संघात 4 सामने झाले. मुंबईने यादरम्यान पहिल्या 6 ओव्हरमध्ये चेन्नईच्या 10 विकेट्स घेतल्या. स्पिनर क्रुणालने अंतिम 3 सामन्यात ओपनिंग गोलंदाजी केली. यादरम्यान क्रुणालने ओपनरची विकेट घेतली.

बातम्या आणखी आहेत...