आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयपीएल:इंग्लंड-ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आयपीएल प्लेऑफला मुकणार!

मुंबई18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येत्या ३१ मार्चपासून यंदा १६ व्या सत्रातील आयपीएलला सुरुवात हाेणार आहे. यादरम्यान इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियातील खेळाडू यंदाचे आयपीएलचे सत्र पूर्ण खेळण्याची शक्यता कमी आहे. यामुळे त्यांना आयपीएलच्या प्लेऑफ सामन्यांना मुकावे लागणार असल्याचे चित्र आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील प्रतिष्ठेच्या अॅशेस कसाेटी मालिकेला १६ जूनपासून सुरुवात हाेत आहे. त्यामुळे या मालिकेच्या तयारीसाठी इंग्लंड संघ १ जूनपासून आयर्लंड टीमविरुद्ध एकमेव कसाेटी खेळणार आहे. यंदाच्या आयपीएलची फायनल २८ मे राेजी हाेणार आहे. त्यामुळे इंग्लंड संघाच्या खेळाडूंना याच्या तयारीसाठी आयपीएलमधून लवकर काढता पाय घ्यावा लागणार आहे. यामुळे आयपीएल संघ माेठ्या अडचणीत सापडण्याचे शक्यता आहे. यातून त्यांची पुढची फेरीतील प्रवेश अडचणीत येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...