आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • England Beat Holland For The Fifth Time In A Row, England Won By 6 Wickets In The Second ODI

मालिका विजय:इंग्लंड संघाचा सलग पाचव्यांदा हॉलंडवर मात, दुसऱ्या वनडेमध्ये इंग्लंड संघ 6 गड्यांनी विजयी

आम्सटलवीन6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामनावीर जेसन राॅय (७३) आणि फिल साल्टने (७७) शतकी भागीदारीतून इंग्लंड संघाला सोमवारी यजमान हॉलंडविरुद्ध मालिका विजय मिळवून दिला. पाहुण्या इंग्लंड संघाने दुसऱ्या वनडे सामन्यात ६ गड्यांनी हॉलंडवर मात केली. यासह मॉर्गनच्या नेतृत्वात इंग्लंड संघाने तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली. आता मालिकेतील तिसरा वनडे सामना उद्या बुधवारी होणार आहे.

यजमान हॉलंड संघाने नाणेफेक जिंकून आपल्या घरच्या मैदानावर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, संघाची निराशाजनक सुरुवात झाली. टीमला ४१ षटकांत अवघ्या २३५ धावांची खेळी करता आली. प्रत्युत्तरामध्ये इंग्लंड संघाने ३६.१ षटकांत चार गड्यांच्या मोबदल्यात विजयाचे लक्ष्य सहज गाठले. संघाकडून सलामीच्या जाेडीची खेळी लक्षवेधी ठरली. या दाेघांनी १३९ धावांच्या भागीदारीची सलामी देत संघाच्या विजयाचा मजबूत पाया रचला.

बातम्या आणखी आहेत...