आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Sports
 • England Lose In Penalty Shootout From Italy; Italy Won 3 2; News And Live Updates

इटली चॅम्पियन:इटलीकडून पेनल्टी शूटआऊटमध्ये इंग्लंडचा पराभव; 3-2 ने इटली संघ विजयी

लंडनएका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
 • निर्धारित वेळेत लढत बरोबरीत; निकाल पेनल्टी शूटआऊटमध्ये

अनुभवी डिफेंडर जियाेर्जियाे चिएलिनीच्या कुशल नेतृत्वाखाली इटली फुटबाॅल संघाने प्रतिष्ठेचा युराे कप जिंकला. इटलीने फायनलमध्ये मध्यरात्री यजमान इंग्लंडला पराभवाची धूळ चारली. इटलीने पेनल्टी शूटअाऊटमध्ये ३-२ अशा फरकाने रोमहर्षक विजयाची नाेंद केली. यासह इटली संघाने दुसऱ्यांदा युराे चॅम्पियन हाेण्याचा पराक्रम गाजवला.

दुसरीकडे पहिल्यांदाच फायनल गाठत युराे कपवर नाव काेरण्याचा यजमान इंग्लंडचा प्रयत्न अपयशी ठरला. मात्र, टीमच्या ल्यूक शाॅने दुसऱ्याच मिनिटाला गाेल करून अापल्या नावे िवक्रमाची नाेंद केली. इटलीच्या विजयामध्ये अनुभवी डिफेंडर जियाेर्जियाे चिएलिनी अाणि लियाेनार्दो बाेनूची यांचे माेलाचे याेगदान राहिले. या दाेघांनी इंग्लंडच्या स्ट्रायकरचा विजयाचा प्रयत्न हाणून पाडला.

बक्षिसांचा वर्षाव

 • चॅम्पियन 300 कोटी रुपये
 • उपविजेता 263 कोटी रुपये
 • एकूण 3285 काेटींची बक्षिसे

65% पझेशनने लढतीत इटलीचे वर्चस्व सिद्ध
1:56 सेकंदात ल्यूक शाॅने सामन्यात पहिला गाेल केला. हा फायनलमधील सर्वात कमी वेळेतील विक्रमी गाेल ठरला.

 • इटली टीम इंग्लंड
 • 65 पजेशन 35
 • 19 शॉर्ट 6
 • 6 शॉर्ट टारगेटवर 2
 • 21 फाउल 13
 • 3 कॉर्नर 5

पेनल्टीसाठी युवांची निवड; इंग्लंडचा डावपेच अपयशी
युराे कपची पहिल्यांदाच फायनल गाठणाऱ्या इंग्लंड टीमला युवांचा सामन्यातील सहभाग महागात पडला. त्यामुळे टीमला फायनलमध्ये बलाढ्य इटलीकडून पराभव पत्करावा लागला. अनुभवीएेवजी इंग्लंडने युवांना संधी दिली. इंग्लंडने पेनल्टी शूटअाऊटसाठी कर्णधार हॅरी केन, मॅग्याेर, २३ वर्षीय रॅशफाेर्ड, २१ वर्षीय सांचाे अाणि १९ वर्षीय साकाला संधी दिली. मात्र, त्यांचा प्रयत्न अपुरा ठरला. इटलीने पेनल्टी शूटअाऊटसाठी बेलाेटी, जाेर्जिन्हाे, बेरार्डी, बाेनुची अाणि बर्नाडेस्कीला संधी देऊन विजयश्री खेचून अाणली.

 • प्लेयर ऑफ द टुर्नामेंट : जियानलुइगी डोनारुम्मा (इटली)
 • गोल्डन बूट : रोनाल्डो (पाेर्तुगाल)
 • यंग प्लेयर ऑफ द टुर्नामेंट: पेड्री (स्पेन)
 • गोल्डन ग्लव्स : पिकफोर्ड (इंग्लंड)

युवा जोशच्या तुलनेत अनुभव अधिक वरचढ
इटली संघाचे पेनल्टी शूटअाऊटची माेहीम फत्ते करणाऱ्या खेळाडूंच्या वयाची सरासरी १४३ वर्षे

 • 34 वर्षे 71 दिवसांचा बाेनूची अंतिम लढतीत वयस्कार गाेल स्काेअरर
 • 45 वर्षांनंतर युराे कपचा निकाल लागला पेनल्टी शूटअाऊटमध्ये.
 • 10 वा खेळाडू जाॅजिन्हाे इटलीचा. त्याने दाेन किताब जिंकले.
 • 53 वर्षांनंतर इटली संघाने दुसऱ्यांदा युराे कप पटकावला.
बातम्या आणखी आहेत...