आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • England Pak Joint Title! Final In Melbourne On Sunday; 2 Days 95% Chance Of Rain

फायनलवर पावसाचे सावट:इंग्लंड-पाकला मिळणार संयुक्त विजेतेपद! रविवारी मेलबर्नमध्ये फायनल; 2 दिवस 95% पावसाची शक्यता

मेलबर्न5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंग्लंड आणि पाकिस्तान संघ उद्या रविवारी टी-२० फाॅरमॅटमध्ये विश्वविजेत्या हाेण्यासाठी मेलबर्नच्या मैदानावर उतरणार आहेत. मात्र, याच मैदानावर सध्या पावसाचे सावट आहे. या ठिकाणी ९५ टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सलग दाेन दिवस रविवारी व साेमवारी या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. यातून पावसाच्या व्यत्ययाने इंग्लंड आणि पाकिस्तान संघांचा संयुक्तपणे विजेतेपद देऊन गाैरवण्यात येईल. या सामन्यादरम्यान पावसासह वादळी वाऱ्याचाही धाेका वर्तवण्यात आला आहे. आयसीसीने अंतिम सामन्यासाठी एक दिवस राखीव ठेवला आहे. मात्र, रविवारी आणि साेमवार या दाेन्ही दिवशी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पाकिस्तान संघाने उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा पराभव केला. यासह पाकला अंतिम फेरी गाठता आली. दुसरीकडे भारतावर मात करून इंग्लंडने फायनलचे तिकीट मिळवले. मात्र, आता याच अंतिम सामन्यावर पावसाचे सावट आहे.

बातम्या आणखी आहेत...