आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाॅकी विश्वचषक स्पर्धा:यजमान भारतासह इंग्लंड, स्पेन, वेल्स एकाच गटात

भुवनेश्वर17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुढच्या वर्षी सत्राच्या सुरुवातीलाच भारतामध्ये हाॅकीची विश्वचषक स्पर्धा हाेणार आहे. यासाठी गुरुवारी ड्राॅ जाहीर करण्यात आले. यादरम्यान यजमान भारतीय संघाचा ड गटात समावेश आहे. याच गटात भारतासह इंग्लंड, वेल्स आणि स्पेन टीमचाही सहभाग आहे. पुढच्या वर्षी १३ जानेवारीपासून भुवनेश्वर येथे या स्पर्धेला सुरुवात हाेणार आहे. अ गटामध्ये आॅस्ट्रेलियासह अर्जेंटिना, फ्रान्स आणि दक्षिण आफ्रिका टीम सहभागी आहे. तसेच ब गटात गतचॅम्पियन बेल्जियम, जर्मनी, दक्षिण काेरिया आणि जपान संघ सहभागी आहेत. भारतीय संघाने १९७५ मध्ये पहिल्यांदा विश्वविजेता हाेण्याचा बहुमान मिळवला हाेता. त्यानंतर १९७३ मध्ये संघ उपविजेता ठरला. तसेच १९७१ मध्ये भारतीय संघाला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले हाेते. भारतीय संघ ५१ वर्षांत चाैथ्यांदा विश्वचषकाचे यजमानपद भूषवत आहे.

बातम्या आणखी आहेत...