आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • England Wins With 'Power', England Wins 6 2 Over Iran Team In The Opener

फिफा वर्ल्ड कप:‘पाॅवर’ने इंग्लंड विजयी, इंग्लंडचा सलामीला 6-2 ने इराण संघावर विजय

दोहा8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाॅवरफुल गेमच्या बळावर इंग्लंड संघाने साेमवारी फिफाच्या विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेतील आपल्या माेहिमेला दमदार सुरुवात केली. यंदा किताबाचा प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या इंग्लंड संघाने सलामीच्या सामन्यात आशियातील इराण टीमला धूळ चारली. इंग्लंड संघाने ६-२ अशा फरकाने विजयी सलामी दिली. आक्रमक आणि पाॅवरफुल खेळीमुळे इंग्लंडला खलीफा इंटरनॅशनल स्टेडियमवर माेठा विजय साजरा करता आला. साका (४३, ६२ वा मि.), बेलिंगहॅम (३५ वा मि.), स्टर्लिंग (४५+१ वा मि.), राशफाे (७१ वा मि.) आणि ग्रेलिश (८९ वा मि.) यांनी शानदार गाेल करून इंग्लंडला पहिला विजय मिळवून दिला. इराण संघाकडून तारेमीने (६५, ९५+१३ वा मि) गाेलचा डबल धमाका उडवला. मात्र, इतर खेळाडूंच्या सुमार खेळीने इराण टीमला पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लंड संघाने दमदार सुरुवात करताना पहिल्या मध्यतरांमध्येच ३-० ने आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या हाफमध्ये ३ गाेल करू टीमने सामना जिंकला.

डावपेच, मानसिक पाठबळ : काेच साऊथगेटचा मंत्र फिफाच्या विश्वचषक स्पर्धेदरम्यान सुमार खेळीमुळे संघांतील खेळाडूंवर प्रचंड दबाव निर्माण हाेताे. त्यामुळे त्यांना आगामी सामन्यातील सर्वाेत्तम कामगिरीसाठीचा आत्मविश्वास राहत नाही. हेच दडपण त्यानंतर संबंधित संघांच्या पराभवासाठी सातत्याने कारणीभूत ठरत असते. मात्र, इंग्लंड संघाच्या बाबतीत असे घडताना दिसत नाही. कारण प्रशिक्षक साऊथगेट यांनी हीच महत्त्वाची नाळ लक्षात घेतली आणि त्यावर प्रचंड काम केले. यातून आता पराभवानंतरही खेळाडूंना तणावमुक्त ठेवण्यावरच त्यांचा अधिक भर असताे. यामुळे पराभवानंतरही संघातील खेळाडू हे आगामी सामन्यात विजयासाठी जाेमाने खेळताना दिसतात. यासाठी साऊथगेट यांनी डावपेच आणि मानसिकता हाच मंत्र सर्वांना दिला आहे. याच्या आधारे संघातील खेळाडू हे सरस खेळी करताना दिसतात. आता सलामीला इंग्लंडच्या टीमला दमदार सुरुवात करता आली. टीमच्या खेळाडूंनी इराण संघाच्या दुबळ्या गाेलरक्षकाचा फायदा घेतला. टीमला सामन्यात माेठा विजय साजरा करता आला. टीमने माेहिमेला दमदार सुरुवात केली.

विश्वचषकात आफ्रिकन संघांसमाेर तगडे आव्हान 1 पाचही आफ्रिकन संघांचे प्रशिक्षक आपापल्या देशातील माजी फुटबाॅलपटूच आहेत. घानाचे आेटाे, कॅमरूनचे रिगाेबर्ट, माेरक्काेचे वेलिड, ट्युनिशियाचे जलेल कादरी या चारही माजी खेळाडूंनी यंदा विश्वचषकात प्रशिक्षकाच्या भूमिकेत पदार्पण केले आहे.

2 पाचही संघांचे आव्हान २०१८ मध्ये गटातील साखळीत संपुष्टात आले हाेते. त्यामुळे आता दर्जेदार कामगिरीतून हे पाचही संघ यंदा पुढच्या फेरीत प्रवेश करण्यासाठी उत्सुक आहेत. १९८२ पासून अद्याप एकाही आफ्रिकन संघाला विश्वचषकाची बाद फेरी गाठता आली नाही.

3 सेनेगल संघाला आपल्या टाॅप गाेल स्काेअरर साडियाे मानेच्या अनुपस्थितीमध्ये तगड्या आव्हानाचा सामना करावा लागत आहे. त्याच्या नावे ३४ गाेलची नाेंद आहे. मात्र, दुखापतीमुळे ताे स्पर्धेतून बाहेर पडला.

4 इजिप्त आणि अल्जिरिया संघांना वर्ल्डकपची मुख्य फेरी गाठता आली नाही. त्यामुळे स्पर्धेदरम्यान सालाह, मेहरेजसारख्या स्टार खेळाडूंची अनुपस्थिती जाणवत आहे. साडियाेदेखील स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

स्पर्धेत सहभागी आफ्रिकन संघ संघक्रमवारी कॅमरून 43 घाना 61 मोरक्को 22 सेनेगल 18 ट्युनिशिया 30 {सेनेगल संघाची सर्वाेत्तम रॅकिंग; यंदा किताबाचा दावेदार पैकी एक.

बातम्या आणखी आहेत...