आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइंग्लंड महिला फुटबाॅल संघाने आपल्या एेतिहासिक वेंबले स्टेडियमवर ८७ हजार १९२ चाहत्यांच्या साक्षीने युराे कपचा बहुमान पटकावला. इंग्लंडचा संघ महिलांच्या या फुटबाॅल स्पर्धेत चॅम्पियन ठरला. संघाने फायनलमध्ये आठ वेळच्या किताब विजेत्या जर्मनीचा पराभव केला. इंग्लंड संघाने २-१ अशा फरकाने सनसनाटी विजयाची नाेेंद केली. यासह इंग्लंडचा संघ तब्बल २४ वर्षांनंतर या स्पर्धेत किताबाचा मानकरी ठरला. इंग्लंड टीमचा आताचा हा सर्वात माेठा विजय मानला जाताे. कारण, आतापर्यंत या युराे कपवर सर्वाधिक आठ वेळा जर्मनी संघाला आपले नाव काेरता आले. मेहनत करत टीमने फुटबाॅलमध्ये माेठी प्रगती साधली. यातूनच इंग्लंडचा महिला संघ १९९८ मध्ये विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेसाठी पात्र ठरला हाेता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.