आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातब्बल १७ वर्षांनंतर पाक दाैरा करणाऱ्या इंग्लंड संघाने सलामीच्या कसाेटीत पहिल्याच दिवशी विश्वविक्रमाला गवसणी घातली. इंग्लंड संघाने कसाेटीच्या पहिल्या डावात पहिल्या दिवशी गुरुवारी ७५ षटकांत ५०६ धावा काढल्या. यासह इंग्लंड टीमच्या नावे पहिल्याच दिवशी विश्वविक्रमी धावसंख्येची नाेंद झाली. या विक्रमामध्ये सलामीवीर बेन डकेट (१०७), जॅक क्राउली (१२२), ओली पॉप (१०८) आणि हॅरी ब्रुकने (नाबाद १०१) माेलाचे याेगदान दिले.
त्यामुळेच इंग्लंडला पहिल्या दिवशी विक्रमी धावसंख्या उभी करता आली. डकेट आणि क्राउलीने दमदार सुरुवात करून देताना संघाला द्विशतकी भागीदारीची सलामी दिली. त्यामुळे इंग्लंड संघाला पहिल्या दिवसअखेर ४ बाद ५०६ धावा काढता आल्या. संघाने प्रतिषटक सरासरी ६ धावांची कमाई करत विश्वविक्रमाचा पल्ला गाठला. इंग्लंडचे चार फलंदाज शतकवीर ठरले. अंधुक प्रकाशामुळे पहिल्या दिवसाचा खेळ ७५ षटकांपर्यंत हाेऊ शकला. आता बेन स्टाेक्स (३४) व ब्रुक्स (१०१) हे दाेघेही मैदानावर कायम आहेत. यजमान संघाकडून घरच्या मैदानावर जाहिदने २, रऊफ व अलीने प्रत्येकी १ विकेट घेतली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.