आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • English Cricketer Danielle Wyatt Engaged Georgie Hodge; Proposed To Virat Kohli | Female Football Manager | Virat Kohli

महिला इंग्लिश क्रिकेटरने गर्लफ्रेंडसोबत केली एंगेजमेंट:कधीकाळी विराट कोहलीला केले होते प्रपोज

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

इंग्लंडची महिला क्रिकेटर डॅनी व्याटने महिला फुटबॉल मॅनेजर जॉर्जी हॉजसोबत एंगेजमेंट केली आहे. मैत्रिणीसोबतच्‍या एंगेजमेंटची माहिती तिने सोशल मीडियावर शेअर केली. व्याट दीर्घकाळापासून इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे. दक्षिण आफ्रिकेत नुकत्याच पार पडलेल्या T20 विश्वचषकातही ती संघाचा एक भाग होती.

गुरुवारी झाली एंगेजमेंट
व्‍याटने 2 मार्च रोजी जॉर्जीसोबत एंगेजमेंट केल्यानंतर रात्री 9 च्या सुमारास सोशल मीडियावर फोटो पोस्ट केला. या फोटोमध्ये दोघेही एकमेकांना किस करताना दिसत आहेत. फोटोमध्ये जॉर्जी तिच्या अनामिकेत घातलेली अंगठी दाखवताना दिसत होती. फोटोसोबत व्याटने कॅप्शनमध्ये लिहिले, 'माइन फॉरएव्हर'.

जॉर्जी सीएए स्पोर्ट्स असोसिएशनच्या महिला फुटबॉल संघाच्या मुख्य व्यवस्थापक आहेत. महिला फुटबॉल संघाच्या व्यवस्थापनासोबतच ती संघाची रणनीती आणि नियोजनाचीही काळजी घेते.

व्याट दक्षिण आफ्रिकेत
व्‍याटने दक्षिण आफ्रिकेतील केप टाउनमध्‍ये त्यांचा एंगेजमेंट फोटो पोस्ट केला आहे. म्हणजेच ती सध्या दक्षिण आफ्रिकेतच आहे. जिथे तिने यापूर्वी महिला T20 विश्वचषक खेळला होता. उपांत्य फेरीत यजमान दक्षिण आफ्रिकेकडून पराभूत झाल्याने त्यांचा संघ अंतिम फेरीत प्रवेश करू शकला नाही. हा सामना 24 फेब्रुवारीला खेळला गेला होता आणि आता 2 मार्चला व्याटने एंगेजमेंटचा फोटो पोस्ट केला आहे.

विराट कोहलीला केले होते प्रपोज
31 वर्षीय व्याटने 2014 मध्ये भारतीय क्रिकेटर विराट कोहलीला एका ट्विटर पोस्टद्वारे प्रपोज केले होते. तिने ट्विटर पोस्टद्वारे 'कोहली मॅरी मी' म्हणजेच विराट कोहली माझ्याशी लग्न कर असे लिहिले होते. तेव्हा ती 22 वर्षांची होती आणि म्हणाली की, हे फक्त एक गंमतीतील ट्विट आहे, आणखी काही नाही. विराटने इंग्लंडमधील एका सामन्यादरम्यान डॅनीसोबत फोटोसाठी पोजही दिली होती. कोहलीने 2017 मध्ये बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत लग्न केले होते.

व्याट WPL चा भाग असणार नाही
डॅनी व्याट भारतात पहिल्यांदाच होत असलेल्या महिला प्रीमियर लीगचा (WPL) भाग असणार नाही. ती WPL लिलावात सहभागी झाली होती पण खरेदीदार मिळाला नाही. या कारणामुळे ती WPL खेळणार नाही. व्याट टॉप ऑर्डरची फलंदाज आहे आणि आवश्यकतेनुसार ती ऑफ स्पिन बॉलिंगही करू शकते. ती महिला बिग बॅश आणि महिला द हंड्रेड स्पर्धेत खेळली आहे.

इंग्लंडसाठी 4 शतके
लीग क्रिकेट खेळण्याव्यतिरिक्त, व्याटने 2010 मध्ये इंग्लंडसाठी एकदिवसीय आणि T20 आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. इंग्लंडसाठी 102 एकदिवसीय सामन्यांमध्ये तिने 2 शतकांच्या मदतीने 1776 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर तिने 143 टी-20 सामन्यांमध्ये 2 शतकेही केली आहेत. टी-20मध्‍ये 125.21 स्‍ट्राईक रेटने 2369 धावा आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात मधल्या फळीनंतर, तिने 2017 पासून सलामीला सुरुवात केली आणि या स्थानावर तिने इंग्लंडसाठी खूप धावा केल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...