आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कराबाओ कप:ईपीएलच्या टाॅप आर्सेनलचे पॅकअप, आर्सेनल क्लबचा घरच्या मैदानावर पराभव

लंडन4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

यजमान आर्सेनल फुटबाॅल क्लबला ईएफएल कप (कराबाआे कप) स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. इंग्लंडच्या या फुटबाॅल क्लबला सामन्यात पाहुण्या ब्राइटन क्लबने धुळ चारली. ब्राइटन क्लबने ३-१ ने सनसनाटी विजय संपादन करत आगेकूच कायम ठेवली. डॅनी वेलबेक (२७ वा मि.), काआेरू (५८ वा मि.) आणि तारीक लेम्पेटे (७१ वा मि.) यांनी सर्वाेत्तम खेळीतून आपल्या ब्राइटन क्लबला दणदणीत विजय निश्चित केला. आर्सेलन क्लबकडून एडी तियाहने (२० वा मि.) घरच्या मैदानावर एकमेव गाेल केला. मात्र, तिसऱ्या फेरीतील पराभवाने आर्सेनलचे आव्हान संपुष्टात आले. ब्राइटन संघाने सलग तिसऱ्या विजयासह प्री-क्वार्टर फायनलमधील आपला प्रवेश निश्चित केला.

नाॅटिंघमचा टाॅटेनहॅमवर विजय : प्रीमियर लीगमध्ये तळात असलेल्या नाॅटिंघम फाॅरेस्ट क्लबने तिसऱ्या फेरीत सनसनाटी विजयाची नाेंद केली. या क्लबने सामन्यात टाॅटेनहॅम हाॅट्सपरवर मात केली. नाॅटिंघमने २-० ने सामना जिंकला. रेनान लाेडी (५० वा मि.) आणि जेसी लिंगार्डने (५७ वा मि.) यांनी संघाला एकर्फी विजय मिळवून दिला.

मँचेस्टर सिटीचा कट्टर प्रतिस्पर्धी चेल्सीवर विजय मँचेस्टर सिटीने कट्टर प्रतिस्पर्धी चेल्सीला धुळ चारली. सिटीने सामन्यात एतिहाद स्टेडियमवर तिसऱ्या फेरीत २-० ने विजयाची नाेंद केली. रियाद मेहरेज (५३ वा मि.) व अल्वारेज (५८ वा मि.) यांनी संघाचा विजय निश्चित केला. लिव्हरपूलने डर्बी काैंटीला पेनल्टीमध्ये ३-२ ने पराभूत केले. या संघांतील रंगतदार सामना निर्धारित वेळेत शून्य गाेलने बराेबरीत हाेता.

बातम्या आणखी आहेत...