आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • EURO Cup Final : Demand For Italy Vs England Final Tickets Sky High, One Seat Cost 56 Lakhs

फुटबॉलचा नाद खुळा:युरो कप फायनलचे एक तिकीट रिसेल-ई-कॉमर्स साइटवर 56 लाखांत!

लंडनएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
उपांत्य फेरीत इंग्लंड विजयी झाल्यानंतरचा जल्लोष. - Divya Marathi
उपांत्य फेरीत इंग्लंड विजयी झाल्यानंतरचा जल्लोष.
  • मूळ किमतीपेक्षा 183 पट महाग विकली जात आहेत तिकिटे

जगातील अनेक देशांत फुटबॉल खेळाशिवाय आणखीही बरेच काही आहे. जोश, आवड आणि वेडेपणा जितका खेळाडूंत दिसून येतो त्याहीपेक्षा जास्त त्यांच्या फॅन्समध्ये दिसतो. ११ जुलै रोजी युरो कपसाठी होत असलेल्या अंतिम सामन्यासाठी इंग्लंडच्या लोकांत प्रचंड उत्साह दिसून येत आहे. इंग्लंड आणि इटलीत होणाऱ्या सामन्याची तिकिटे ई-कॉमर्स वेबसाइटवर तब्बल ५६ लाख रुपयांत ब्लॅकमध्ये विकली जात आहेत. ही किंमत ३० हजार रुपये या मूळ किमतीपेक्षा १८३ पट अधिक आहे. यात तिकिटाची किंमत सुमारे ४४.५ लाख रुपये आणि बुकिंगच्या ११.५ लाख रुपयांचा समावेश आहे. युरो कपच्या उपांत्य फेरीत डेन्मार्कला पराभूत करून इंग्लंड अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर समर्थक एका-एका तिकिटासाठी मरमर करत आहेत.

यूएफाच्या अधिकृत संकेतस्थळावरून मागील आठवड्यातच सर्व तिकिटे विकली गेली. परंतु हायप्रोफाइल तिकीट रिसेल वेबसाइट, सोशल मीडिया व ईबेसारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर हजारो सीट्स रिकाम्या असल्याचे दाखवले जात आहे. या सीट्स विकून अनधिकृतपणे पैसे कमावले जात आहेत. टिकोंबो संकेतस्थळावर सामन्याचे एक तिकीट ५६ लाखांत मिळत आहे. लाइवफुटबॉल तिकीट साइटवर ४१.२५ लाख रुपयांत विकले जात आहे, तर इतर प्लॅटफॉर्मवर ५.१६ ते ३१ लाख रुपयांत मिळत आहे.

रविवारी अंतिम सामना पाहण्यासाठी ६७ हजारांहून अधिक फुटबॉलप्रेमी वेंबले स्टेडियमवर पोहोचतील. ऑनलाइन माध्यमांवरही अशीच गर्दी असेल. आयटीव्ही, इंग्लंडच्या मते विविध प्लॅटफॉर्मद्वारे २.७६ कोटी लोकांनी उपांत्य फेरीतील सामना बघितला आहे. अंतिम सामन्यात बीबीसी व आयटीव्हीवर प्रेक्षक संख्या १९६६ च्या वर्ल्डकप फायनलचा (३.२३ कोटी प्रेक्षक) विक्रम मोडीत काढेल.

बातम्या आणखी आहेत...