आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Eva Has Been Working With Croatia For Over 30 Years; Earlier She Was Like A Sister, Now In The Role Of A Mother

फिफा वर्ल्ड कप:इव्हा क्रोएशियासोबत 30 वर्षांपासून करते काम; पूर्वी ती बहिणीसारखी होती, आता आईच्या भूमिकेत

तारिक पंजा | स्पिलित (क्राेएशिया)8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रोएशियाने २०१८ च्या विश्वचषकाची अंतिम फेरी गाठून संपूर्ण जगाला चकित केले. या देशात फुटबॉलचा विकास झपाट्याने झाला. युगोस्लाव्हियापासून वेगळे झाल्यानंतर देशाने १९९४ मध्ये व्यावसायिक फुटबॉल खेळण्यास सुरुवात केली आणि १९९६ मध्ये युएफा म्हणून पहिली स्पर्धा खेळली. या स्पर्धेत त्यांना उपांत्यपूर्व फेरी गाठण्यात यश आले. या यशामध्ये सुरुवातीपासून क्रोएशियासोबत असलेली एक महिला होती. इव्हा ऑलिव्हरी १९९१ मध्ये क्रोएशियन फुटबॉल फेडरेशनमध्ये सहभागी झाली. ऑलिव्हरी म्हणते की, ती टीमसोबत इतके दिवस आहे की तिला डायनासोरसारखे वाटते. ऑलिव्हरीला टेनिसपटू व्हायचे होते व म्हणून ती अमेरिकेला गेली. पण, तिने तिचे स्वप्न सोडून क्रोएशिया फुटबॉल संघात प्रवेश केला. जेव्हापासून तेथे टाइपरायटर वापरले जात होते, तेव्हापासून तिने क्रोएशियाबरोबर काम करते. क्रोएशियन फुटबॉलसाठी तिचे काम देशभक्ती म्हणून पाहते. युएफा अधिकाऱ्याने ऑलिव्हरी आणि तिच्यासोबत काम करणारी इव्हान्शिका सुदक यांच्याबद्दल सांगितले की, ती खेळाडूंच्या प्रत्येक गरजेकडे लक्ष देते. ती तिची कामे जबाबदारीने करते. दोघी कुटुंबाप्रमाणे महासंघाची काळजी घेतात. २०१६ मध्ये ऑलिव्हरी यांना संघ व्यवस्थापक बनवले.

ती तिच्या सुरुवातीच्या कारकीर्दीशी तुलना करताना म्हणते की, “मी क्रोएशिया संघाच्या पहिल्या संघासोबत बहिणीसारखी होते आणि सध्याच्या संघासोबत आईसारखी आहे.’ खेळाडू माझ्यासोबत केवळ सामना-खेळाबाबतच बोलत नाहीत, तर कुटुंब, मुले, कायदेशीर समस्या व घटस्फोट बद्दलही मनमोकळे बोलतात.

बातम्या आणखी आहेत...