आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Even After A Strong Comeback, Chahar's Entry Into The Team For The T20 World Cup Is In Trouble!

कामगिरीत सातत्य ठेवण्याची गरज:दमदार पुनरागमनानंतरही चहरचा टी-20 वर्ल्डकपसाठी संघातील प्रवेश अडचणीत!

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सहा महिन्यांच्या दीर्घ विश्रांतीनंतर वेगवान गाेलंदाज दीपक चहरने झिम्बाव्वे दाैऱ्यावर दमदार पुनरागमन केले. निवड समितीने ठेवलेल्या विश्वासाला सार्थकी लावताना त्याने सलामीच्या वनडेतील विजयात माेलाचे याेगदान दिले. त्याने तीन बळी घेतले. याच कामगिरीमुळे त्याला सामनावीर पुरस्काराने गाैरवण्यात आले. दुखापतीमुळे दीपक चहरला सहा महिने क्रिकेटच्या मैदानाबाहेर बसावे लागले हाेते. आता त्याला झिम्बाव्वे दाैऱ्यासाठी संघाकडून संधी देण्यात आली. आगामी टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघातील स्थान निश्चित करण्यासाठी ताे उत्सक आहे. मात्र, त्याच्यासाठी ही वाट खडतर मानली जात आहे.

निवड समितीच्या स्पष्टाेक्तीने शमीच्या निवडीची आशा धूसर; भुवनेश्वरचे नाव आहे आघाडीवर यूएईमध्ये टी-२० फाॅरमॅटच्या आशिया कप स्पर्धेसाठी जायबंदी जसप्रीत बुमराह व हर्षल पटेलला मुकावे लागले. दाेघेही दुखापतीने त्रस्त आहेत. या दाेघांचीही दुखापत कायम राहिली तरच दीपक चहरचा वर्ल्डकपसाठी भारतीय संघातील प्रवेश निश्चित मानला जात आहे. मात्र, याचदरम्यान माे. शमीचा अडसर आहे. गाेलंदाजीत निवड समितीसमाेर शमीचा पर्याय आहे. मात्र, त्याला वर्ल्डकपदरम्यान संधी मिळू शकत नाही. गत विश्वचषकादरम्यानच निवड समितीने हे स्पष्ट केले हाेेते. यात भुवनेश्वरचे नाव आघाडीवर आहे.

आशिया कपनंतर ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका; भारतीय संघात चहरची निवड निश्चित आशिया कप स्पर्धेनंतर भारतीय संघ लगेच ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका खेळण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. यादरम्यान टीम इंडियाचे खेळाडू सहा टी-२० आणि तीन वनडे सामने खेळणार आहेत. त्यामुळे या दाेन्ही संघांविरुद्ध मालिकेतूनही खेळाडूंना वर्ल्डकपसाठीचा दावा मजबूत करता येऊ शकताे. यासाठी दर्जेदार खेळीवर सर्वांची नजर असेल. या संघातील प्रवेशासाठी चहर प्रबळ दावेदार आहे.

चहरसह इतरही दावेदार दीपक चहरच्या कामगिरीमध्ये गुणवत्ता आहे. त्यामुळे इतरांसारखा ताेही विश्वचषकासाठी भारतीय संघातील स्थान निश्चित करणारा प्रबळ दावेदार आहे,अशी प्रतिक्रीया माजी क्रिकेटपटू मदनलाल यांनी दिली.

वर्षभरात भारतीय गाेलंदाज गाेलंदाज टी-२० बळी सर्वाेच्च अॅव्हरेज भुवनेश्वर 21 23 4/13 19.82 हर्षल 17 23 4/25 20.95 आवेश 13 11 4/18 31.81 बुमराह 8 10 2/10 14.80 अर्शदीप 6 9 3/12 14.55 हार्दिक 18 8 4/33 34.87 चहर 6 6 2/15 32.16 शमी 5 6 3/15 23.33 सिराज 2 2 1/22 30.50 शार्दूल 3 2 2/33 40.50 उमरान 3 2 1/42 56.00 चहर व इतरांची तुलनात्मक खेळी गाेलंदाज टी-20 बळी सर्वाेच्च अॅव्हरेज चहर 20 26 6/7 22.26 भुवनेश्वर 10 11 4/22 26.27 हर्षल 5 9 3/22 17.33 हार्दिक 7 7 4/38 15.57 नटराजन 3 6 3/30 13.83 शार्दूल 3 4 2/33 28.75 नवदीप 3 3 2/34 31.00 सिराज 2 2 2/25 35.50 आवेश 1 0 - -

बातम्या आणखी आहेत...