आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • T 20 Match Update |Even After Scoring 200+ Runs Against Australia, India Lost, The Country Remembers Dhoni In Every Mistake

विश्‍लेषण:ऑस्ट्रेलियाविरुद्ध 200+ धावा करुनही भारत हरला, प्रत्येक चुकीत देशाला धोनी आठवतो; फलंदाजीतही नेतृत्व दाखवायचा

चंद्रेश नारायणन | मुंबई5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आशिया चषकात पंत धावबाद करू शकला नाही तेव्हा धोनीची अनुपस्थिती सर्वांना जाणवली

भारताचा स्टार क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीने २०२० मध्ये पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटपासून निवृत्ती घेतल्यानंतर भारतीय संघात एक प्रकारचा एकटेपणा आला आहे. संघ यातून सावरू शकला नाही. अनेकदा संघ संधी गमावतो तेव्हा याची आठवण ताजी होते. नुकत्याच झालेल्या आशिया चषकादरम्यान ऋषभ पंतला यष्ट्यांवर चेंडू मारून बाद करण्याची संधी मिळाली होती.

मात्र, त्याने श्रीलंकेविरुद्ध ही संधी गमावली. परिणामी भारतीय संघ बाहेर झाला. त्या वेळी तत्काळ क्रिकेट विश्वातील तज्ज्ञांकडून पंतची तुलना धोनीशी केली जाऊ लागली. त्या वेळी धोनी असता तर त्याने बाद केले असते, असे म्हटले गेले. कसोटी क्रिकेटमध्ये धोनीची जागा लवकर भरण्यात आली, पण पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये अजूनही त्याची गरज जाणवत आहे. अशाच पाच घटना. ज्यात मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये धोनीचा गेम प्लॅन दिसून आला...

फलंदाजीतही नेतृत्व दाखवायचा
धोनी ७२ टी२० मध्ये कर्णधार होता व ४१ सामने जिंकला. यात १८ सामने टॉस जिंकून व २३ गमावून जिंकले. धोनीने सर्वाधिक १३ सामने टॉस गमावून प्रथम फलंदाजी करत जिंकले.

धोनीच्या नेतृत्वात जिंकलेल्या ४१ पैकी २२ सामन्यांत धोनी नाबाद राहिला. विराट आपल्या नेतृत्वात जिंकलेल्या ३० पैकी ११ सामन्यात व रोहित ३१ पैकी ३ सामन्यात नाबाद राहिला.

२००७ चा टी-२० वर्ल्डकप फायनल

नव्या गोलंदाजाला द्यायचा चेंडू, जेणेकरून फलंदाज गोंधळेल
पाकिस्तान १५८ च्या लक्ष्याचा पाठलाग करत होता. मिसबाह क्रीझवर होता आणि एक विकेट बाकी होती. पाकला अखेरच्या षटकात १३ धावा हव्या होत्या. अनुभवी हरभजनचे एक षटक बाकी होते, पण धोनीने रिस्क घेत जोगिंदर शर्माकडे चेंडू दिला. कारण मिसबाहने हरभजनच्या तिसऱ्या षटकामध्ये तीन षटकार खेचले होते. धोनीच्या या धोरणाने काम केले. जोंगिदर शर्माचा पहिला चेंडू वाइड गेला आणि दुसऱ्यावर षटकार मारण्यात आला. मात्र, त्याने पुनरागमन करत तिसऱ्या चेंडूवर मिसबाहची विकेट घेऊन पाकचा डाव संपुष्टात आणला. धोनीच्या जादूने भारताला पहिला टी-२० वर्ल्ड चॅम्पियन बनवले.

२०११ चा वर्ल्डकप फायनल
मोठ्या सामन्यात जबाबदारी घेतली, शेवटपर्यंत टिकला

२०११ मध्ये झालेल्या क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेमध्ये संपूर्ण सामन्यामध्ये युवराज सिंहीची अष्टपैलू कामगिरी, जहीरची अचूक गोलंदाजी, सचिनच्या सातत्याने भारताने विजय मिळवला. मात्र, श्रीलंकेविरुद्ध खिलाफ फायनलमध्ये भारताने टॉप ऑर्डर फलंदाज स्वस्तात गमावले होते. गंभीर आणि कोहलीने ८३ धावांची भागीदारी केली, पण कोहली बाद झाल्यानंतर धोनी खेळपट्टीवर आला. त्याने इन-फॉर्म युवराजला पाठवले नाही. हा मास्टरस्ट्रोक ठरला. कारण धोनीने गंभीरसोबत चौथ्या गड्यासाठी १०९ धावांची भागीदारी करत संघाला विजयाच्या जवळ पोहोचवले. त्याने ७९ चेंडूवर ९१ धावांची नाबाद खेळी केली.

२०१३ ची चॅम्पियन्स ट्रॉफी
खेळाडूमधील प्रतिभा ओळखत त्यानुसार घेतली भूमिका
या स्पर्धेने भारतात पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटच्या नव्या युगाला सुरुवात केली. सचिन वनडेतून निवृत्त झाल्यानंतर गंभीर-सहवाग ओपनिंग करतील, हे निश्चित होते. मात्र, या स्पर्धेत सर्व बदलले. भारत रोहित व धवन या नव्या ओपनिंग जोडीसोबत स्पर्धेत उतरला. त्यांची ही योजना यशस्वी ठरली. कारण रोहित-शिखरची पुढील एक दशकापर्यंत सर्वाय यशस्वी जोडी ठरली. धोनीनेच रोहितला आेपनर म्हणून स्थापित केले. ही कल्पना करणे कठीण आहे की, रोहितची वनडेचा ओपनर होण्यापूर्वी फक्त ३० ची सरासरी होती आणि तो वनडे वर्ल्डकप संघातही निवडला गेला नव्हता. आता तो कसोटीतही ओपनिंग करतो आणि सर्व फॉरमॅटचा कर्णधार आहे.

२०१३ चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल
प्रयोग करण्यात पुढे होता, अंतिम षटकांतही स्पिनर्सला चेंडू दिला
मल्टी-नेशन क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये महेंद्र सिंह धोनीच्या मेंदूने चॅम्पियनप्रमाणे काम केले. बर्मिंगहॅममध्ये इंग्लंडविरुद्धचा अंतिम सामना पावसाच्या व्यत्ययामुळे प्रभावित झाला होता. भारताने २० षटकांत ७ गडी गमावत १२९ धावा केल्या. इंग्लंडने ८.४ षटकांत ४६ धावांवर ४ गडी गमावले होते. यानंतर मोर्गन आणि बोपाराने पाचव्या गड्यासाठी ६४ धावा जोडत संघाला सावरले. धोनीने डावातील १८वे षटक टाकण्यासाठी इशांतकडे चेेंडू सोपवला. या षटकात इशांतने भरपूर धावा दिल्या. इशांतने या षटकात मोर्गन व बोपारा दोघांना बाद करत धाेनीचा निर्णय योग्य ठरवला. यानंतर इंग्लंडला १६ चेंडूत २० धावा हव्या होत्या. धोनीने स्पिनर्स अश्विन आणि जडेजाला चेंडू दिला आणि भारत ५ धावांनी जिंकला.

२०१६ टी-२० वर्ल्डकप
केवळ गोलंदाजावर अवलंबून न राहता गरजेनुसार भूमिका बदलली
बांग्लादेशविरुद्ध बंगळुरूत खेळलेला हा करो वा मरोचा सामना होता. भारताला स्पर्धेत टिकून राहण्यासाठी हा सामना जिंकणे गरजेचे होते. बांग्लादेश सहजपणे लक्ष्याचा पाठलाग करत होता आणि त्याला जिंकण्यासाठी शेवटच्या षटकात ११ धावा हव्या होत्या. धोनीने पुन्हा एकदा सरप्राइज दिले आणि युवा अष्टपैलू हार्दिक पंड्याकडे चेंडू सोपवला.

हार्दिकच्या चेंडूवर ४ चौकार लगावण्यात आले. बांग्लादेशच्या संघाला शेवटच्या चेंडूमध्ये केवळ दोन धावा पाहिजे होत्या. अशा वेळी महेंद्र सिंह धोनीने थ्रोमध्ये मदत मिळेल या उद्देशाने आपल्या हातातील ग्लोज काढून ठेवले. बांग्लादेशचा फलंदाज शुवागता होमने हार्दिकचा बाउंसर मिस केला आणि बायवर धाव घेण्यासाठी धावला. धोनीकडे चेंडू येताच त्याने वेगाने धावत बेल्स उडवल्या आणि मुस्ताफिजूरला धावबाद केले. अशा पद्धतीने भारताने हा सामना जिंकला.

बातम्या आणखी आहेत...