आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sports
  • Exclusive | Antivirus Kits For Kabaddi Players, Ban On Face Attacks In Karate; Taekwondo Athletes At The Olympics Now In New Dress

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:कबड्डीपटूंसाठी अँटिव्हायरस किट, कराटेमध्ये फेस अटॅकवर बंदी; आॅलिम्पिकमध्ये तायक्वांदाेचे खेळाडू आता नव्या ड्रेसमध्ये

भाेपाळएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • काेराेनानंतर खेळाच्या आयाेजनात बदल; कॉम्बॅट- काँटॅक्ट स्पाेर्ट‌्‌्सच्या स्वरूपात बदल;

(कृष्णकुमार पांडे)

काेराेनावर मात करण्यात भारताला जवळपास यश येत आहे. हेच लक्षात घेऊन आता केंद्र सरकारने नवीन गाइडलाइन तयार करून क्रीडा विश्वाला काहीशी सूट देण्याची घाेषणा केली. मात्र, लाॅकडाऊननंतर मैदानावर परतत असलेल्या या खेळाच्या स्वरूपात माेठा बदल हाेणार आहे. कॉम्बॅट आणि बाॅडी काँटॅक्टसारख्या खेळात बदलाचे वारे आहेत. यात कुस्ती, बाॅक्सिंग, कराटे, कबड्डी आणि तायक्वांदाेसारख्या खेळ प्रकाराचा समावेश आहे. या सर्वच खेळांच्या आंतरराष्ट्रीय फेडरेशनने याबाबत पंचांकडून सल्ला मागवला. कबड्डीमध्ये अँटकव्हायरस किट तयार केले जावेे. कराटेत फेस अटॅकवर बंदी घालावी, असे पंचांनी सुचवले.

कबड्‌डी : बोनस लाइन क्रॉस केल्याने डबल गुण

चढाईपटूला आता बाेनस लाइन क्रास केल्यावर डबल गुण मिळतील. यशस्वी चढाईनंतर डिफेंड टीमचा एक खेळाडू बाद व्हायला हवा. याशिवाय डिफेंडरच्या स्पर्शानंतर ही चढाई पूर्ण व्हावी. याशिवाय या कबड्डीपटूंसाठी आता अँटी व्हायरस अशी किट तयार केली जावी. इराणच्या महिला संघ बुरखा वापरतात. अशी प्रणालीही यात लागू करण्याची मागणी आहे. -जेसी शर्मा, आंतरराष्ट्रीय पंच

कुस्ती : शिबिरापूर्वी सर्व मल्ल व्हावेत क्वाॅरंटाइन

आपण सर्वांना आता गंभीर परिस्थितीत खबरदारीची गरज आहे. शिबिरात सहभागी हाेणाऱ्या सर्व मल्लांनी स्वत:हून क्वाॅरंटाइन व्हावे. याशिवाय त्यांना शिबिराच्या बाहेर जाता येणार नाही, अशी खबरदारी घ्यावी. प्रत्येक खेळाडू, काेच व स्टाफची चाचणी व्हावी. यासाठी प्रत्येक संघांकडून अधिकृत अशी फी देखील आकारली जावी. मॅट सातत्याने सॅनिटायझ व्हावी. - कृपाशंकर, आंतरराष्ट्रीय पंच

कराटे : ऑनलाइन स्पर्धा आयाेजनावर भर द्यावा

ऑनलाइन आणि स्किल कॉम्पिटीशनवर आता अधिक फाेकस दिला जावा. खेळाडूंच्या काैशल्य वाढीसाठी प्रयत्न महत्त्वाचा ठरेल. याशिवाय युवा खेळाडूंच्या वेट कॅटेगरीच्या कामगिरीचा दर्जा उंचावण्यावरही अधिक भर दिला जावा. यासाठी वजन आणि वय गटातून गाळणी लावून चांगले खेळाडू पुढे जातील, असा प्रयत्न करावा. यातून एका इव्हेंटमधून एकच खेळाडू वरती जाईल. तसेच फेस अॅटकवर बंदी आणली जावी. -परितोष शर्मा, आंतरराष्ट्रीय पंच

बॉक्सिंग: क्लोजर रेंज व होल्डिंगवर अंकुश

खेळाडूंच्या क्लोजर रेंज, क्लिपिंग आणि होल्डिंगवर आता अंकुश ठेवला जावा. हे टाळण्याचा प्रयत्न केला जावा. याशिवाय प्रत्येक सहभागी खेळाडूंची चाचणी हाेणे गरजेचे आहे. अहवालानुसारच त्याला स्पर्धेत सहभागी करावे. काेच, पंचांची तपासणी व्हावी. -जोगिंदर सोन, आंतरराष्ट्रीय पंच

तायक्वांदो : पंचांसाठी रबरचेे ग्लाेव्हज सक्तीचे

वर्ल्ड तायक्वांदाे फेडरेशनने सुरक्षेच्या दृष्टीने आता आॅलिम्पिक स्पर्धेत या खेळाडूंसाठी नवीन पाेशाख तयार केला. यात स्कीन टाइट पंॅट व शर्ट घालणार. हेड गेयर, क्राउन गार्ड, चेस्ट गार्ड, स्किन गार्ड आणि ग्लाेव्हजमध्येही बदल झालेला दिसेल.पंचांना रबरचे ग्लाेव्हज सक्तीचे असतील. . - राजीव कुमार, आंतरराष्ट्रीय पंचांकडून

बातम्या आणखी आहेत...