आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • The Most Expensive FIFA World Cup In History In Qatar; England's Fighter Jets Deployed For Security, Expenditure Of 17 Lakh Crores

फिफा वर्ल्डकप:कतारमध्ये इतिहासातील सर्वात महागडा फिफा वर्ल्डकप; सुरक्षेसाठी इंग्लंडचे फायटर जेट्स तैनात

दोहा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिवाळीनंतर कतारमध्ये फिफाच्या विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेचा धमाका उडणार आहे. राजधानी दाेहा येथे २० नाेव्हेंबरपासून या वर्ल्डकपला सुरुवात हाेणार आहे. जगभरातील बलाढ्य ३२ संघ सहभागी झाले. त्यामुळे विश्वविजेतेपदाचा बहुमान मिळवण्यासाठी या संघांमध्ये माेठी चुरस रंगणार आहे.

कतारला पहिल्यांदाच फिफाच्या विश्वचषकाचे यजमानपद भूषवण्याचा बहुमान मिळाला आहे. त्यामुळे कतारनेही भव्य स्वरूपात आयाेजन केले आहे. यातून कतारमधील विश्वचषक हा आतापर्यंतचा सर्वात महागडा मानला जात आहे. या जागतिक दर्जाच्या इव्हेंटच्या सुरक्षेसाठी खास इंग्लंडमधील फायटर जेट्स तैनात आहेत. आयाेजनावर तब्बल १७ लाख काेटींचा खर्च झाला आहे.

सुरक्षा व्यवस्था: खास ६५ हजार काेटींत फायटर जेट्सची खरेदी; १२ टायफून स्क्वाड्रनही सज्ज आयाेजनासह कतार महासंघाने स्पर्धेच्या सुरक्षा व्यवस्थेसाठीही माेठा खर्च केला आहे. यासाठी कतारने थेट २०१७ मध्ये युराेपातील सर्वात माेठ्या सुरक्षा कंपनीकडून महागडी फायटर जेट्स विकत घेतली. या २४ फायटर जेट्स आणि ९ अत्याधुनिक हाॅक-एमके-१६७ ट्रेनिंग जेटसाठी आयाेजकांना थेट ६५ हजार काेटी रुपये माेजावे लागले आहेत. याशिवाय याच सुरक्षेसाठी इंग्लंडमधील प्रसिद्ध १२ टायफून स्क्वाड्रानही तैनात झाले आहेत. यामुळे कतारमधील विश्वचषकादरम्यान चाेख सुरक्षा व्यवस्था पुरवली जाणार आहे. लंडन आॅलिम्पिक स्पर्धेदरम्यान असलेले सुरक्षाकवच आता कतारमधील विश्वचषक स्पर्धेदरम्यान पाहायला मिळत आहे. तसेच सिक्युरिटी सेंटर ड्रोन, सीसीटीव्ही आणि सेन्सरच्या माध्यमातून प्रत्येक घडामाेडीवर नजर राहत आहे.

व्यवस्था: स्पर्धेच्या यशस्वी आयाेजनाची मदार १६० देशांच्या २० हजार स्वयंसेवकांवर १३०० तास प्रशिक्षण : वि‌श्वचषकाच्या यशस्वी आयाेजनाची मदार आता १६० देशांतून आलेल्या २० हजार स्वयंसेवकांवर आहे. यासाठी ते आॅनलाइन आणि आॅफलाइन स्वरूपात प्रशिक्षण घेत आहेत. त्यामुळे त्यांना आतापर्यंत १३०० तासांचे खास प्रशिक्षण देण्यात आले आहे. यामध्ये त्यांना सर्व प्रकारच्या सेवा-सुविधांचे प्रशिक्षण दिले जात आहे. मात्र, यादरम्यान या सर्वांनी काेणत्याही प्रकारचा माेबदला घेतला नाही. त्यामुळे पूर्णपणे माेफत स्वरूपात हे २० हजार स्वयंसेवक विश्वचषकादरम्यान सेवा पुरवणार आहेत. यामध्ये १८ वर्षांच्या युवापासून थेट ८० वर्षांच्या आजाेबा-आजीपर्यंतच्या स्वंयसेवकाचा समावेश आहे. या भूमिकेसाठी जगभरातून तब्बल ४ लाख २० हजार अर्ज आले हाेते. त्यानंतर यातून ५८ हजार जणांच्या मुलाखती झाल्या. यातून २० हजार जणांची निवड करण्यात आली.

निराशा: तिकीट न मिळाल्यास थेट सामन्यांना मुकावे लागणार; हाॅटेल मालकांनी नाही भरले वाहिन्यांचे बिल कतारमधील विश्वचषक स्पर्धेच्या आयाेजनासाठी सर्वांनी कंबर कसली आहे. मात्र, दुसरीकडे ब्राॅडकास्टर आणि हाॅटेल मालक यांच्यात कलगीतुरा सुरू आहे. यामुळे विदेशातील चाहते वेठीस धरल्या जाणार आहेत. या दाेघांमधील वादामुळे तिकीट न मिळालेल्या फुटबाॅलप्रेमींना हाॅटेलमध्ये बसून थेट प्रक्षेपणातून सामन्यांचा आनंद लुटता येणार नाही. कारण, याच वादातून हाॅटेल मालकांनी प्रक्षेपणासाठीचे बिल दिले नाही. त्यामुळे या ठिकाणी सामन्यांचे प्रक्षेपण हाेणार नाही. याचा सर्वात माेठा फटका विदेशी चाहत्यांना बसणार आहे. त्यांचा निश्चितपणे यातून हिरमाेड हाेणार आहे. मालकांनी या प्रक्षेपणासाठी २२ लाख रुपये देण्यास नकार दर्शवला आहे. यातूनच या वादाची ठिणगी पडली आहे. त्यामुळेच या सामन्यांच्या प्रक्षेपणाचा पेच निर्माण झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...