आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Expensive Footballer Aniket In Indian Team, Opportunity For 2 Players From Maharashtra | Marathi News

भारतीय संघ जाहीर:महागडा फुटबॉलपटू अनिकेत भारतीय संघात, महाराष्ट्राच्या 2 खेळाडूंना संधी

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रातील सर्वात महागडा फुटबाॅलपटू अनिकेत जाधवची भारतीय संघात निवड करण्यात आली. ताे येत्या २३ आणि २६ मार्च राेजी आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण सामने खेळणार आहे. आयएसएल चॅम्पियन हैदराबाद टीमचा सुपरस्टार मिडफील्डर असलेल्या अनिकेतला आता भारताकडून पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी संधी मिळाली आहे. भारतीय संघ आता बहरीन आणि बेलारूसविरुद्ध सामने खेळणार आहे. यासाठी साेमवारी भारतीय संघ जाहीर झाला. यात मुंबईच्या राहुल भेकेचा समावेश आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे दाेन खेळाडू संघात आहेत. बहरीनमध्ये या सामन्यांचे आयाेजन करण्यात आले आहे.

आयएसएलमध्ये खेळी
काेल्हापूरच्या अनिकेत जाधवने नुकत्याच झालेल्या यंदाच्या सत्रातील इंडियन सुपर लीग फुटबाॅल स्पर्धेत लक्षवेधी खेळी केली. त्याचे हैदराबाद संघाच्या पहिल्या विजेतेपदामध्ये माेलाचे याेगदान राहिले. त्याने या लीगमध्ये २० सामन्यांत हैदराबाद संघाचे प्रतिनिधित्व केले. यादरम्यान त्याने दाेन गाेल आणि ती असिस्ट केले.

मेहनतीचे फळ
फिफा विश्वचषकाने आत्मविश्वास द्विगुणित झाला. आता प्रचंड मेहनत करत त्याने सीनियर भारतीय संघातही स्थान निश्चित केले. कसून सरावाने कामगिरी उंचावली. त्याचेच फळ आता अनिकेतला मिळाले. जयदीप अंगीरवाल, काेच

संघ : गोलरक्षक : गुरप्रीतसिंह संधू, अमरिंदर सिंह, प्रभ सुखन गिल. डिफेंडर- प्रीतम कोतल, सेरिटों फर्नांडेस, राहुल भेके, हॉर्मीपम रुईवाह, संदेश झिंगन, अनवर अली, चिंगलेनसना सिंह, शुभाशिष बोस, आकाश मिश्रा, रोशन सिंग. मिडफील्डर- बिपिन सिंह, अनिरुद्ध थापा, प्रोनय हलदर, जॅक्सन सिंग, फर्नांडेस, वीपी सुहैर, डेनिश फारूक, यासिर मोहंमद, अनिकेत जाधव. फाॅरवर्ड- मनवीर सिंह, लिस्टन कॉलाको, रहीम अली.

बातम्या आणखी आहेत...